spot_img
Wednesday, January 15, 2025

Latest Posts

मुंबईतील हवेचा दर्जा पुन्हा खालवला, मुंबई महापालिका उचलणार कठोर पाऊल!

Mumbai Air Pollution : मुंबईच्या बदलत्या हवामानामुळे वायुप्रभूषण वाढत आहे. मुंबईसह उपनगरमध्येही हवेची गुणवत्ता खालवण्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील हवेचा दर्जा ढासळला आहे. मुंबईची हवा अत्यंत चिंताजनक असल्यामुळे गेल्या दोन आठवड्यांपासून मुंबईत ठिकठिकाणी अंशत: ढगाळ वातावरण दिसत आहे. यामुळे मुंबईतील हवेच्या गुणवत्तेबाबत चिंतेचि बाब व्यक्त केली जात आहे. मुंबईच्या हवेचा निर्देशांक १०४ इतका नोंदवण्यात आला आहे. यामुळे आता मुंबई महापालिकेने याबात योग्य निर्णय घेत कठोर पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे.

मुंबईच्या हवेचा निर्देशांक १०४ इतका नोंदवण्यात आला असून हे वातावरण अतिवाईट स्थितीत असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. काही भागात वाईट ते अतिवाईट हवेची नोंद करण्यात आली आहे. मुंबईतील विलेपार्ले, कुलाबा, मालाड, कुर्ला, भांडुप, देवनार, बोरिवली, वांद्रे पूर्व या ठिकाणच्या हवेची गुणवत्ता अतिवाईट स्थितीत असल्याचे सांगितले जात आहे. याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ, जुहू, महापे, नेरुळ या ठिकाणी हवेची गुणवत्ताही वाईट असल्याचे दर्शविले जात आहे. मुंबईच्या वाढत्या वायुप्रदूषणामुळे मुंबईकरांना सध्या प्रदूषणाचा त्रास भोगावा लागत आहे.

मुंबईच्या हवेची गुणवत्ता खालावली
मुंबईतील वातावरण खालावत असल्याने मुंबईकरांना या हवेचा सामना करावा लागत आहे. या वातावरणातील घातक असलेल्या पीएम २.५ आणि पीएम १० धुलीकणांचे प्रमाणही वाढले आहे. खालावलेच्या वातावरणामुळे देवनार, कुर्ला , कांदिवली, मालाड, नेव्ही नगर, कुलाबा, शिवडी, वरळी परिसरात ‘वाईट’ हवेची नोंद करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेने याबाबत ठोस पाऊले उचलण्यास सुरुवात केली असून काही दिवस सातत्याने रस्त्यांवर पाणी फवारणी केली जात आहे. तसेच प्रदूषण नियंत्रण मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करणाऱ्या २८ बांधकाम साइट्स शोधून त्यावरही कारवाई करण्यात आली आहे.

हे ही वाचा:

लाचखोर वनक्षेत्रपालाच्या घराची झडती; 57 तोळं सोनं अन् 1 कोटी 31 लाखांची कॅश

“आता खरी मजा आहे”, Manoj Jarange Patil यांची Devendra Fadnavis यांच्यावर टीका

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss