Sunday, December 3, 2023

Latest Posts

जगातील पाचव्या क्रमांकाचा श्रीमंत व्यक्ती एकेकाळी बिल गेट्सचा सहाय्यक..

जगातील पाचव्या क्रमांकाचा श्रीमंत व्यक्ती एकेकाळी बिलगेट्सचा सहाय्यक..

जगातील पाच सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींच्या यादीत सामील होणं ही काही सोपी गोष्ट नव्हे. स्टीव्ह बाल्मर हा जगातील पाचव्या क्रमांकाचा श्रीमंत व्यक्ती ठरला आहे. स्टीव्ह बाल्मर हा एकेकाळी बिल गेट्सचा सहाय्यक राहिलेलाअसून त्याने ही अद्भुत कामगिरी करून दाखवलेली आहे. जगातील श्रीमंत व्यक्तींमध्ये बिल गेट्स असो किंवा एलोन मस्क प्रत्येकाने व्यवसायात यश मिळवले आहे त्यामुळेच ते जगातील अव्वल श्रीमंत व्यक्तींमध्ये सामील झाले आहेत. आता या सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत आणखी एका नावाची भर पडलेली आहे. गमतीची गोष्ट अशी की जगातील पाच सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये समावेश असलेल्या स्टीव्ह बाल्मरने आपल्या कारकिर्दीची सुरुवात खूप काळ जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या बिल गेट्सचा सहाय्यक म्हणून केली होती.

स्टीव्ह बाल्मर यांची एकूण संपत्ती किती?

ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार सध्या जगातील पाचव्या क्रमांकाच्या श्रीमंत व्यक्ती स्टीव्ह बाल्मर ठरलेला आहे. ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार, स्टीव्ह बाल्मरची सध्याची एकूण संपत्ती १२० अब्ज डॉलर इतकी आहे. बाल्मरची एकूण संपत्ती २४ तासांत २.६० अब्ज डॉलर इतक्याने वाढली आहे. आता फक्त एलोन मस्क, जेफ बेझोस, बर्नार्ड अर्नॉल्ट आणि बिल गेट्स हे ४ लोकं त्यांच्या पुढे आहेत.

सर्वाधिक श्रीमंत ५ लोकांची नावे

ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार, सध्या जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलोन मस्क आहेत. एलोन मस्क यांची एकूण संपत्ती १९८ अब्ज डॉलर आहे. त्यानंतर दुसऱ्या स्थानकावर जेफ बेझोस आहेत. जेफ बेझोस यांची एकूण संपत्ती १६० अब्ज डॉलर इतकी आहे. त्यानंतर तिसऱ्या स्थानकावर फ्रान्सचे बर्नार्ड अर्नॉल्ट येतात, त्यांची एकूण संपत्ती १५७ अब्ज डॉलर इतकी आहे. तसेच चौथ्या क्रमांकावर मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स असून त्यांची एकूण संपत्ती १२४ अब्ज डॉलर इतकी आहे.

यावर्षी स्टीव्ह बाल्मर यांच्या संपत्तीत झाली खूप मोठी वाढ

स्टीव्ह बाल्मर हे जवळपास १४ वर्षे मायक्रोसॉफ्टचे सीईओ राहिले होते. सत्या नडेला यांनी त्यांचे पद सोडल्यानंतर २०१४ मध्ये मायक्रोसॉफ्टच्या सीईओची जबाबदारी त्यांना देण्यात आली होती. स्टीव्ह बाल्मरच्या संपत्तीत मायक्रोसॉफ्ट या कंपनीचा अजूनही खूप मोठा वाटा आहे. मायक्रोसॉफ्टमध्ये त्यांची सुमारे ४ टक्के भागीदारी आहे. कंपनीच्या शेअर्सच्या किंमतीत झालेल्या वाढीमुळे स्टीव्ह बाल्मरच्या एकूण संपत्तीमध्ये यावर्षी सुमारे ३० अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे.

हे ही वाचा : 

करवा चौथच्या दिवशी परिणीतीने केला साजश्रृंगार, लाल ड्रेस, हाताला मेहंदी, भांगेत कूंकू …

Diwali 2023, तुम्हाला देखील दिवाळीत बोनस मिळणार आहे? याची सुरुवात नेमकी झाली तरी कशी?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss