spot_img
spot_img
Tuesday, October 3, 2023
spot_img
spot_img

Latest Posts

देशात आले पहिले यूपीआय एटीएम , कार्डचे टेन्शन संपणार

हल्लीच्या जीवनात ऑनलाईन बँकिंग ट्रान्सक्शन हे सरस होत आहे. त्यामुळे ऑनलाईन सेवा हि वाढतच जात आहे. भारतामधील पहिले यूपीआय (UPI ATM) एटीएम लाँच करण्यात आले आहे. हिताची लिमिटेडची उपकंपनी असलेल्या हिताची पेमेंट सर्विसने UPI ATM लॉन्च केले आहे.

हल्लीच्या जीवनात ऑनलाईन बँकिंग ट्रान्सक्शन हे सरस होत आहे. त्यामुळे ऑनलाईन सेवा हि वाढतच जात आहे. भारतामधील पहिले यूपीआय (UPI ATM) एटीएम लाँच करण्यात आले आहे. हिताची लिमिटेडची उपकंपनी असलेल्या हिताची पेमेंट सर्विसने UPI ATM लॉन्च केले आहे. यूपीआय एटीमच्या मदतीने कार्डशिवाय पैसे काढता येणार आहेत. ग्लोबल फिनटेक फेस्टमध्ये प्रथमच यूपीआय एटीएम (UPI ATM) पैसे काढण्याचे मशीन प्रदर्शित करण्यात आले आहे. यूपीआय एटीएमचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. भाजप नेत्यांनीही यूपीआय एटीएमचे व्हिडीओ पोस्ट केले आहेत.

यूपीआय एटीएममुळे डेबिट कार्डच्या फसवणुकीपासून ग्राहकांची सूटका होणार असल्याचा दावा केला जात आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या (NPCI) सहकार्याने हे पाऊल उचलण्यात आले आहे. UPI एटीएमला व्हाइट लेबल एटीएम (WLA) म्हणून आणले आहे. एटीएम यूजर्सला वेगवेगळ्या खात्यावरुन यूपीआयच्या माध्यमातून पैसे काढण्याची सुविधा दिली जातेय. हे एटीएम वापरण्यासाठी कार्डची गरज नाही. क्यूआर (QR) कोड स्कॅन करून पैसे काढता येतात. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी यासंबंधीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यूपीआय एटीएम क्यूआर कोडद्वारे वापरता येणार आहे. या एटीएमसाठी क्रेडिट किंवा डेबिट कार्डची गरज लागणार नाही. त्याशिवाय यूपीआय एटीएममुळे फसवणुकीचा धोकाही कमी होतो. कारण यूपीआय एटीएम वापरताना कोणताही कार्ड नंबर किंवा पिन नंबर टाकण्याची गरज नाही. यूपीआय एटीएमकडे कार्ड स्किमिंगसारख्या आर्थिक फसवणुकीला प्रतिबंध करण्यासाठी एक सकारात्मक उपाय म्हणून पाहिले जाते. यूपीआय एटीएमची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.

मुंबई ग्लोबल फिनटेक फेस्टमध्ये यूपीआय एटीएमचा डेमो व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. त्यामध्ये यूपीआय एटीएमला टच पॅनल असल्याचे दिसतेय. यूपीआय कार्डलेस कॅश या पर्यायावर क्लिक केल्यास आणखी एक विंडे सुरु होतो. त्यामध्ये पैशांचे विविध पर्याय दिसता. १०० रुपये, ५०० रुपये, १००० रुपये, २००० रुपये, ५००० रुपये आणि अन्य असे पर्याय दिसतात. तुम्हाला जितके पैसे काढायचे त्यावर क्लिक करा. त्यानंतर स्क्रिनवर क्यूआर कोड येईल. आता त्यानंतर यूपीआय अॅपवरु क्यूआर कोड स्कॅन करा. त्यानंतर युजर्सला बँक खाते निवडावे लागेल. त्यानंतर UPI पिन टाका. तुम्ही निवडलेली रक्कम यूपीआय एटीएममधून बाहेर येईल.

हे ही वाचा: 

मराठा समाजाने आता आंदोलन मागे घ्यावं, बच्चू कडू

मुंबईतील ओपन डेस्क बससेवा चालूच राहणार

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss