Saturday, June 3, 2023

Latest Posts

वानखेडेंनी दाखल केलेल्या याचिकेवर २२ मे रोजी सुनावणी होणार

आर्यन खान प्रकरण सध्या चर्चेत आहे. आर्यन खान प्रकरणामध्ये २५ कोटीची खंडणी केल्या प्रकरणी आयआरएस अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) आणि त्यांच्या टीमच्या सहकाऱ्यांवर आरोप करण्यात आले होते.

आर्यन खान प्रकरण सध्या चर्चेत आहे. आर्यन खान प्रकरणामध्ये २५ कोटीची खंडणी केल्या प्रकरणी आयआरएस अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) आणि त्यांच्या टीमच्या सहकाऱ्यांवर आरोप करण्यात आले होते. काल समीर वानखेडे यांची ५ तास चौकशी करण्यात आली होती. आज पुन्हा त्यांना सीबीआय ने ११ वाजता बोलावले होते आणि पुन्हा त्यांची तब्बल ५ तास कसून चौकशी करण्यात आली होती. समीर वानखेडे यांनी हायकोर्टामध्ये दाखल केलेल्या याचिकेवर सीबीआय सोमवारी आपलं म्हणणे सादर करणार आहे. समीर वानखेडे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. त्याचबरोबर सीबीआयने त्यांच्या विरोधात गुन्हा देखील दाखल केला आहे.

आज समीर वानखेडे यांची पाच तासाच्या चौकशीनंतर हायकोर्टाने हायकोर्टाच्या निर्देशानुसार, मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. शुक्रवारी १९ मे रोजी झालेल्या सुनावणीत हायकोर्टाने समीर वानखेडेंना २२ मे पर्यंत अटक न करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याचबरोबर २० आणि २१ मे रोजी समीर वानखेडेंची दोन दिवस पाच तास चौकशी करण्यात आली. चौकशीच्या नंतर समीर वानखेडे यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. सीबीआय कार्यालयातून बाहेर आल्यानंतर त्यांनी ‘सत्यमेव जयते’ एवढंच म्हटले. वानखेडे यांनी दाखल केलेल्या रिट याचिकेवर सोमवारी सुनावणी होणार आहे.

हे ही वाचा:

IPL2023, कोणता संघ प्लेऑफचे चौथे स्थान मिळणार?

Aluminium Foil Paper वापरणे टाळा, उद्भवू शकतो आरोग्यावर मोठा परिणाम!

वर्षा निवासस्थानी जाऊन भगतसिंह कोश्यारींनी घेतली एकनाथ शिंदेची भेट

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss