सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात १ टक्क्यांनी वाढ झाली आहे. आज देशांतर्गत शेअर बाजारात खरेदीचा चांगला जोर दिसून आला आहे. आज शेअर बाजारातील व्यवहार थांबले तेव्हा मुंबई बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ५५५. ७५ अंकांच्या तेजीसह ६५, ३८७.१६ अंकांनी वाढला आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजारात निर्देशांक निफ्टी १८१.५० अंकांच्या तेजीसह १९, ४३५. ३० अंकावर येऊन बंद झाला आहे. दिवसभरातील व्यवहारात आज खरेदीचा जोर चांगल्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. सेन्सेक्स निर्देशांकात ३० मधील २६ कंपनीच्या शेअर दरात वाढ झाली आहे. तर निफ्टी निर्देशांकात ५० पैकी ४४ कंपन्यांच्या दरात वाढ झाली आहे. दिवसभरातील व्यवहार थांबल्यानंतर एल अॅण्ड टी, नेस्ले इंडिया, सन फार्मा आणि अल्ट्राटेक सिमेंटच्या शेअर दरात घसरण झाली आहे तर एनटीपीसीच्या शेअर दरात पाच टक्क्यांची वाढ झाली आहे.
आज दिवशभरातील सर्व व्यवहारामध्ये मेटल्स क्षेत्रातील स्टॉक्समध्ये चांगली वाढ झाली आहे. जेएसडब्लू स्टील आणि टाटा स्टीलच्या दरात ३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मारुती सुझुकीच्या शेअरच्या दरात चांगली खरेदी वाढ झाली आहे. त्याचबरोबर बँकिंग आणि आयटी सेक्टरमधील कंपन्यानाच्या दारात चांगली वाढ झाली आहे. आज शेअर बाजारातील गुंतवणूक दाराना चांगला फायदा झाला आहे. आजच्या वाढत्या अंकामुळे शेअर बाजाराचे भांडवल ३१२.४३ लाख कोटीवर पोहचली आहे. गुरुवारी हेच भांडवल ३०९.५९ लाख कोटी रुपये इतके होते. आज त्याच्यामध्ये २.८४ लाख कोटीची वाढ झाली आहे.
महिन्याच्या पहिल्याच दिवशी २१८४ कंपन्याचे शेअर दर वाढले आहेत. आज मुंबई शेअर बाजारात ३८७६ कंपन्यांचे व्यवहार झाले आहेत. त्यापैकी २१८७ या कंपन्यांमध्ये वाढ झाली आहे. तर १४७९ या कंपन्यांमधील शेअर दरात घसरण झाली आहे. सप्टेंबरच्या पहिल्याच दिवशी २८१ कंपन्यांच्या शेअर दरात ५२ आठवड्यांचा उच्चांक गाठला आहे.
हे ही वाचा:
नाशिक महिला पोलिसांची हात्तभट्यांविरोधी मोठी कारवाई…
इंडिया आघाडीच्या बैठकीत समन्वय समितीची स्थापना, ‘या’ १३ जणांचा समावेश…
भारतातील प्रत्येकाचा हिंदू संस्कृतीशी संबंध, मोहन भागवत
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा