spot_img
spot_img
Wednesday, September 20, 2023
spot_img
spot_img

Latest Posts

चिनी सैनिकांना जेवणामध्ये दिले जातात हे पदार्थ…

चीन (China) हा देश जगातील तिसऱ्या क्रमांकाचा देश आहे. जगातील ताकदवान देश म्हणून चीनचे नाव घेतले जाते.

चीन (China) हा देश जगातील तिसऱ्या क्रमांकाचा देश आहे. जगातील ताकदवान देश म्हणून चीनचे नाव घेतले जाते. चीन या देशात भारताप्रमाणे स्वतंत्र लोकशाही नाही आहे. तिथे फक्त बोलण्यासाठी लोकशाही आहे बाकी सगळा दरारा शी जिनपिंग यांचा आहे. शी जिनपिंगच्या आदेशाशिवाय तिकडे पान देखील हालत नाही. चिनी सैन्यासाठी शी जिनपिंग यांनी काही नियम बनवले आहेत. त्यामुळेच चीनमधील सैन्य हे जगातील सर्वात शक्तिशाली सैन्यापैकी एक आहे. भारत आणि चीन मध्ये बऱ्याचदा छोट्या मोठ्या मुद्यावरून काहींना काही वाद होत असतात. एवढंच नाही तर भारतासोबत चीनने युद्ध केले होते. चीनची सेना आणि चिनी सैनिकांबद्दल आपण जाणून घेतलं पाहिजे.

चिनी सैनिकांनी कोणतेही जेवण देण्याआधी पहिला आहारतज्ज्ञांचा (Dietician) सल्ला घेतला जातो. तसेच सम्पूर्ण सैन्य दलाचा मेनू हा कॉम्पुटर रेकॉर्डेड असतो. याला चीनमध्ये मिलिट्री रेसिपी सिस्टीम (Military Recipe System) देखील म्हणतात. जेव्हा कोणत्या सैनिकासाठी शेफला काही बनवायचं असतं, तेव्हा शेफ कॉम्प्युटर सिस्टीमची मदत घेतात.चिनी सैनिक सकाळी उठून नाश्ता (Breakfast) करतात. त्यामध्ये त्यांना केक, कॉर्नब्रेड, अंडे आणि दूध इत्यादी गोष्टी खाण्यासाठी दिल्या जातात. त्यानंतर दुपारच्या जेवणात आणि रात्रीच्या जेवणात भात, मोड आलेली कडधान्यं, रोल्स, मोमो आणि मीट रोल हे सर्व पदार्थ दिले जातात. त्यासोबतच लसणासोबत शिजवलेलं पोर्क (डुकराचं मटण) देखील दिले जाते. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे नाश्त्यात प्रत्येक चिनी सैनिकाला अंडे आणि २५० लीटर दूध आवश्यक आहे.चिनी सैनिकांना दारु पिण्यावर मनाई आहे. चीनमधील सैनिक दारु पिऊ शकत नाही. हा कायदा १९९० पासून लागू आहे आणि आजही चिनी सैन्यात याचं काटेकोरपणे पालन केलं जातं.

Latest Posts

Don't Miss