तुम्ही रिलायन्स – जिओ नंबर वापरत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी उपयुक्त आहे. कंपनी नवीन वर्षाच्या निमित्ताने आणलेला त्यांचा एक खास प्लान बंद करणार आहे. जिओने हा रिचार्ज प्लान नवीन वर्षाच्या मुहूर्तावर लॉन्च केला होता. ते मर्यादित काळासाठी आणले होते आणि आता त्याची वेळ पूर्णत्वास आली आहे. त्यामुळे कंपनी 11 जानेवारीला हा प्लॅन बंद करणार आहे. त्यापूर्वी तुम्हाला रिचार्ज करायचे असल्यास, तुमच्याकडे दोन दिवसांचा वेळ आहे.
रिलायन्स जिओने 11 डिसेंबर 2024 रोजी हा प्लॅन लॉन्च केला. नवीन वर्षाच्या निमित्ताने ही ऑफर एका महिन्यासाठी आणण्यात आली होती. 2025 रुपयांच्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना 200 दिवसांची वैधता आणि 500GB डेटा मिळतो. जिओचा असा हा पहिलाच रिचार्ज प्लान आहे, ज्यामध्ये ६ महिन्यांपेक्षा जास्त कालावधीची वैधता दिली जात आहे. वैधतेसाठी वारंवार रिचार्ज करून थकलेल्या ग्राहकांसाठी हा एक चांगला पर्याय आहे.
या प्लानमध्ये Jio 200 दिवसांसाठी 500GB डेटा देत आहे. म्हणजेच ग्राहकांना दररोज 2.5GB डेटा मिळतो. दीर्घ वैधता आणि 500GB डेटासह, Jio आपल्या ग्राहकांना इतर फायदे देखील देत आहे. रिचार्जवर, ते ग्राहकांना 500 रुपयांचे Ajio कूपन, Rs 1,500 चे EaseMyTrip कूपन आणि Rs 150 चे Swiggy कूपन देखील देते. याचा अर्थ ग्राहकांना या प्लॅनसाठी जेवढे पैसे द्यावे लागतील त्यापेक्षा जास्त रकमेचे कूपन मिळत आहेत. आता एक महिन्यानंतर कंपनी हा प्लान बंद करत आहे. यासाठी 11 जानेवारी ही शेवटची तारीख आहे. जर तुम्हाला याचा फायदा घ्यायचा असेल तर 11 जानेवारीपूर्वी रिचार्ज करा.
हे ही वाचा:
रंग माझा वेगळा’ मालिकेच्या टीमने शिवानी-अंबरचं केलं केळवण; कलाकारांनी शेयर केले फोटो