हिवाळा जवळ आलेला आहे तर काही ठिकाणी वायुप्रदूषण पुन्हा एकदा शिखरवर पोहचलं आहे. वायू गुणवत्ता निर्देशांक ४५० च्या श्रेणीत असून तो अत्यंत गंभीर मानला जातो. हा वायू प्रदूषण कमी होण्यासाठी सरकारकडून काही पाऊलं देखील उचलले जात आहेत. विशेषतः नवी दिल्ली आणि मुंबईसारख्या शहरांमध्ये, जिथे लोकांनां सर्वाधिक प्रदूषणाचा परिणाम होत आहे. तुम्ही जर घरी असल्यास घरातल्या वायूची गुणवत्ता सुधारण्याचे काही मार्ग आहे त्यातला एक मार्ग म्हणजे तुम्ही चान्गल्या दर्जाचे एअर प्युरिफायर खरेदी करून घरातल्या वायूची गुणवत्ता सुधारू शकता. गेल्या काही वर्षात भारतात एअर प्युरिफायरची मागणी सातत्याने वाढत आहे. Dyson,Philips आणि Xiaomi सारख्या कंपन्या प्रत्येक बजेटमध्ये उत्कृष्ट वैशिष्ट्यांसह
१. Philips Ac 1215/20
बाजारात उपलब्ध असलेल्या कॉम्पॅक्ट आणि सर्वात स्वस्त एअर प्युरिफायर बद्दल बोलायचे झाल्यास Philips Ac 1215/20खरेदी करता येईल. या एअर प्युरिफायरची किंमत ८,९९९ रुपये आहे. या कंपनीचा दावा आहे हा एअर प्युरिफायर चार सतेज फिल्टरेशन प्रोसेस वापरून ९९.९७ टक्के प्रदूषित हवा स्वच्छ करतो. या एअर प्युरिफायरमध्ये डिजिटल डिस्प्ले सिस्टम आहे ज्यामध्ये रियल टाइम हवेची गुणवत्ता पाहिली जाऊ शकते.
२. Xiaomi Smart Air Purifier 4 Lite
Xiaomi Smart Air Purifier 4 Lite ची किंमत ९,९९९ इतकी आहे. हा एक स्मार्ट प्युरिफायर असून वर्तुळाकार एलईडी स्क्रीनसह येतो. हे प्युरिफायर स्मार्टफोन द्वारे MI Home App वरून नियंत्रित केले जाऊ शकते. हा प्युरिफायर दर मिनिटाला ६००० हजार लिटर हवा देऊ शकतो.
३. Dyson Purifier Cool Generation1 Air-TP10
Dyson Purifier CoolGeneration1 Air-TP10 Purifier नुकतेच लॉन्च करण्यात आले आहे. त्याची किंमत ३२,९०० रुपये आहे. हे एक अद्वितीय
प्युरिफायर आहे जे टॉवरसारख्या डीसाइनसह येते हे एअर प्युरिफायर 0.1 मायक्रॉन इतके लहान कण ९९.९५ टक्के काढतात.
४. Dyson Purifier Big+ quiet
Dyson Purifier Big+ quiet हे मोठ्या आकाराच्या सर्वोत्तम एअर प्युरिफायर पैकी एक आहे. हे एअर प्युरिफायर १०७६ चौरस फुटांपर्यंतचे क्षेत्र कावर करू शकणाऱ्या घर आणि ऑफिसेस साठी डीसाइन केले गेले आहे. हे सायलेंट प्युरिफायर आहे, म्हणजेच हवा स्वच्छ आणि कोणत्याही प्रकारच्या वायू किंवा वासही दूर करतो. या प्युरिफायर ची किंमत ६८,९०० इतकी आहे.
हे ही वाचा :
Diwali 2023, जाणून घ्या यंदाच्या लक्ष्मीपूजनाची तारीख, मुहूर्त आणि महत्त्व
Ahmednagar – परिवहन विभागाचा अनागोंदी कारभार