Monday, November 20, 2023

Latest Posts

TRENDING: आता LAPTOP आणि PC होणार स्वस्त

सरकारला IT HARDWARE मध्ये PLI साठी एकूण ४० प्रस्ताव प्राप्त झाले होते. अशी माहिती केंद्रीय तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव  यांनी दिली. IT HARDWARE मध्ये PLI योजनेचा लाभ घेणाऱ्या कंपन्या भारतात लॅपटॉप (LAPTOP) आणि पीसी (PC) आणि सर्वर (SERVER) यांसारखी उपकरणे तयार करतील. यासाठी सर्व कंपन्यांकडून एकूण ३००० कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे.

येणाऱ्या काळात भारतात लॅपटॉप (LAPTOP) आणि पीसी (PC) स्वस्त दरात खरेदी करता येणार आहेत. मागील काही वर्षांपासून भारत (INDIA)  देशामध्ये उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी ‘मेड इन इंडिया’ (MADE IN INDIA) या तत्वावर भर देण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने (CENTRAL GOVERNMENT) एचपी (HP), डेल (DELL) आणि लेनोवो (LENOVO) या कंपन्यांसह इतर २७ कंपन्यांना भारत उत्पादन करण्याची मागणी केली आहे.

केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं की, २७ पैकी २३ कंपन्या भारतात तात्काळ उत्पादन सुरु करतील आणि उर्वरित चार कंपन्या ९० दिवसांत उत्पादन सुरु करतील. पुढच्या ६ वर्षांत PRODUCT LINKED INCENTIVE (PLI) या योजनेंतर्गत ३.५ लाख कोटी रुपयांच्या उत्पादनांची निर्मिती आणि विक्री होण्याची शक्यता आहे. विविध कंपन्यांच्या गुंतवणुकीनंतर सुमारे ५०,००० लोकांना प्रत्यक्ष रोजगार मिळणार आहे. तसेच १,५०,००० लोकांना अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे. पीएलआय योजनेचा दुसरा टप्पा मे महिन्यात अधिसूचित करण्यात आला होता. त्यासाठी १७,००० कोटी रुपयांचे बजेट ठेवण्यात आले होते. केंद्र सरकारने लॅपटॉप, टॅब्लेट इत्यादी गॅझेटच्या आयात बंदीचा निर्णय मागे घेतला. ऑगस्ट २०२३ मध्ये भारताने लॅपटॉपच्या आयातीवर बंदी घालण्याची घोषणा केली होती.

भारत सरकारकडून चालवण्यात येणाऱ्या PRODUCT LINKED INCENTIVE (PLI) या योजनेंतर्गत एचपी (HP), डेल (DELL) आणि लेनोवो (LENOVO) या कंपन्यांसह इतर २७ कंपन्यांना मंजुरी देण्यात आली आहे. यांनतर या कंपन्यांना IT HARDWARE साठी सरकारने घेऊन आलेल्या १७ हजार कोटी रुपयांच्या PRODUCT LINKED INCENTIVE (PLI) या योजनेचा लाभ मिळणार आहे. सरकारला IT HARDWARE मध्ये PLI साठी एकूण ४० प्रस्ताव प्राप्त झाले होते. अशी माहिती केंद्रीय तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव  यांनी दिली. IT HARDWARE मध्ये PLI योजनेचा लाभ घेणाऱ्या कंपन्या भारतात लॅपटॉप (LAPTOP) आणि पीसी (PC) आणि सर्वर (SERVER) यांसारखी उपकरणे तयार करतील. यासाठी सर्व कंपन्यांकडून एकूण ३००० कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे.

हे ही वाचा : 

क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामन्यावर बोलताना संजय राऊतांची टोलेबाजी

WORLDCUP 2023: टीमला ORIGINAL ट्रॉफी मिळते का?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss