Trump vs Zelensky News : युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की ( Volodymyr Zelensky) यांनी शुक्रवारी व्हाइट हाऊसमध्ये जाऊन अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. मात्र या भेटीतच उभय नेत्यांमध्ये संघर्ष झाला. या भेटीनंतर रशिया-युक्रेन युद्धाऐवजी ट्रम्प आणि झेलेन्स्की यांच्या झालेल्या शाब्दिक युद्धाची जगभर चर्चा आहे. रशियाशी करारात युक्रेनला नमते घ्यावे लागेल असा इशारा ट्रम्प यांनी झेलेन्स्की यांना दिला.
या दोन्ही नेत्यांमध्ये औपचारिक बैठकीने सुरुवात झाली. जेव्हा हे दोन्ही नेते एकमेकांशी बोलत होते तेव्हा संपूर्ण जग, विशेषतः रशिया आणि युरोपीय देश त्यांचे प्रत्येक शब्द लक्षपूर्वक ऐकत होते. ट्रम्प आणि झेलेन्स्की यांच्यात झालेल्या अनौपचारिक संभाषणाचे रूपांतर काही वेळेतच वादविवादात झाले. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांना भेटण्यासाठी आले तेव्हा ते आपली भूमिका सोडून युद्ध संपवण्याच्या दिशेने वाटचाल करतील अशी अपेक्षा होती. मात्र नेमकं उलट घडलं. ट्रम्प आणि झेलेन्स्की यांच्यातील वादविवादानंतर झेलेन्स्की व्हाईट हाऊसमधून निघून गेले. झेलेन्स्की आल्यावर ट्रम्प यांनी त्यांचे स्वागत केले होते, मात्र ते निघताना त्यांना निरोप देण्यासाठी गेले नाहीत. या वादानंतर, जगातील अनेक देशांनी, विशेषतः युरोपीय देशांनी, झेलेन्स्की आणि युक्रेनला पाठिंबा दिला आहे.
तत्पूर्वी झेलेन्स्की यांनी ट्रम्प यांना आमच्या राष्ट्रातील मृत्यू तांडवाला जबाबदार असणाऱ्यांशी तडतोड नको अशी मागणी केली. त्यांचा रोख रशियाकडे होता. युक्रेनला रशियापासून वाचविणे शांततेच्या प्रयत्नांसाठी महत्त्वाचे असल्याचे ट्रम्प यांच्याकडे झेलेन्स्की यांनी स्पष्ट केले. त्यावर रशिया-युक्रेन युद्ध समाप्तीचा करार अंतिम टप्प्यात आहे. यातून अमेरिका युक्रेनमधील दुर्मीळ खनिजे खरेदी करण्यासाठी करत असलेला करार न्याय असल्याचे ट्रम्प म्हणाले. विशेष म्हणजे काहीच दिवसांपूर्वी ट्रम्प यांनी झेलेन्स्की यांची संभावना हुकूमशहा म्हणून केली होती.
हे ही वाचा:
Mumbai Megablock: पश्चिम व मध्य रेल्वे मार्गावर आजपासून २ दिवसीय मेगाब्लॉक
Ration Card E-KYC: रेशन कार्ड ला E-KYC केली नाही तर, तर अन्नधान्य मिळणार नाही