spot_img
spot_img

Latest Posts

इतर देशाच्या तुलनेत भारतातील बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर

कोरोना (Corona) काळानंतर जगभरात मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी वाढली. जगभरातील सर्वच देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला.

कोरोना (Corona) काळानंतर जगभरात मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी वाढली. जगभरातील सर्वच देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला. या काळात जगातील अर्थव्यवस्था काही काळासाठी ठाप झाली होती. महागाई वाढल्यामुळे सर्वच गोष्टींमध्ये वाढ झाली. बेरोजगारी वाढल्यामुळे काही लोकांना त्यांच्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. जागतिक मंदीच्या भीतीमुळे जगभरातील देशाच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम झाला. कोरोना काळानंतर आणि रशिया युक्रेनच्या युद्धानंतर जगभरातील अर्थव्यवस्थेवर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे महागाई आणि बेरोजगारी वाढली आहे. भारतामध्ये कोरोना १२ कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत.

जगभरातील सर्वच देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाल्यानंतर बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.बेरोजगारीचा फटका मोठ्या प्रमाणावर आयटी आणि इतर क्षेत्रातील व्यवसायावर झाला आहे. महासत्ता अमेरिका, युके, जर्मनी या देशांवर देखील बेरोजगारीचा परिणाम झाला आहे. जागतिक मंदीची भीतीही व्यक्त केली जात आहे. पाकिस्तानपेक्षा भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी आहे.

 

 

 

जगभरातील देशामध्ये पाहतात आफ्रिकेमध्ये मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी आहे. दक्षिण आफ्रिकेमध्ये बेरोजगारीचा दर ३२. ६ टक्के एवढा आहे. तर बेरोजगारीच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर इराक हा देश आहे. इराकमध्ये १५. ५५ टक्के एवढ्या प्रमाणात बेरोजगारी आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर बोस्निया आणि हर्जेगोविना हे देश असून येथे १३.३ टक्के आहे. या यादीमध्ये अफगाणिस्तान चौथ्या आणि स्पेन पाचव्या क्रमांकावर आहे.

हे ही वाचा: 

Latest Posts

Don't Miss