Friday, April 19, 2024

Latest Posts

UPSC परीक्षेचा निकाल जाहीर, पहिल्या चार क्रमांकावर मुलींनी मारली बाजी

युपीएससी (UPSC) परीक्षा २०२३ चा निकाल जाहीर झाला आहे. पहिल्या चार स्थानावर मुलींनी बाजी मारली आहे. यात इशिता किशोर हिने देशामध्ये अव्वल स्थान मिळवले आहे.

युपीएससी (UPSC) परीक्षा २०२३ चा निकाल जाहीर झाला आहे. पहिल्या चार स्थानावर मुलींनी बाजी मारली आहे. यात इशिता किशोर हिने देशामध्ये अव्वल स्थान मिळवले आहे. दुसऱ्या स्थानावर गरिमा लोहिया तर तिसऱ्या स्थानावर उमा हारिथी एन ही आहे. युपीएससीने दिलेल्या माहितीनुसार या परीक्षेमध्ये ९३३ उमेदवार पात्र ठरले आहेत त्यामध्ये पहिल्या चार क्रमांकावर मुलींनी बाजी मारली आहे. व्यक्तिमत्व चाचणीमध्ये उत्तीर्ण झालेले उमेदवार आणि त्यांचे निकाल अधिकृत वेबसाइट – upsc.gov.in वर पाहता येतो.

युपीएससीच्या प्राथमिक परीक्षा ५ जून २०२२ रोजी पार पडल्या होत्या आणि या परीक्षांचा निकाल २२ जून रोजी जाहीर करण्यात आला. युपीएससीच्या मुख्य परीक्षा १६ ते २५ सप्टेंबर दरम्यान घेण्यात आल्या होत्या. युपीएससी सीएसइ ही एक अत्यंत अपेक्षित परीक्षा आहे जी दरवर्षी तीन टप्प्यांमध्ये पार पडते त्यामध्ये प्राथमिक, मुख्य आणि मुलाखत – युपीएससी द्वारे घेतली जाते. भारतीय प्रशासकीय सेवा (IAS), भारतीय परराष्ट्र सेवा (IFS), भारतीय पोलीस सेवा (IPS), आणि गट ‘A’ आणि गट ‘B’ केंद्रीय सेवा यांसारख्या प्रतिष्ठित पदांसाठी योग्य उमेदवार ओळखणे हे त्याचे प्राथमिक उद्दिष्ट असते.

युपीएससी सीएसइ २०२२ चे टॉप १० रँकिंग उमेदवार –

  1. इशिता किशोर
  2. गरिमा लोहिया
  3. उमा हरठी एन
  4. स्मृती मिश्रा
  5. मयूर हजारिका
  6. गहाण नवया जेम्स
  7. वसीम अहमद भट
  8. अनिरुद्ध यादव
  9. कनिका गोयल
  10. राहुल श्रीवास्तव

    हे ही वाचा:

    Manipur मध्ये माजी आमदाराने भडकवली दंगल, तब्बल ५ दिवसांसाठी इंटरनेट सेवा बंद

    जयंत पाटलांना #ED चौकशीत घेऊन कोणाचा कार्यक्रम कोण करतंय? Who is targeting |

    ईडीकडून नोटीस मिळाल्यावर शक्तिप्रदर्शन करण्याचा नवीनच पॅटर्न – संजय शिरसाट

    Follow Us

    टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss