spot_img
spot_img

Latest Posts

अमेरिकेचे राष्ट्रअध्यक्ष Joe Biden यांचा भारत दौरा रद्द होण्याची शक्यता

भारतामध्ये होत असलेल्या G २० परिषदेसाठी वेगवेगळ्या देशाचे प्रमुख पाहुणे भारतात येणार आहेत. पण आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन (Joe Biden) यांचाही भारत दौरा अनिश्चितता असल्याचे दिसून येत आहे.

भारतामध्ये होत असलेल्या G २० परिषदेसाठी वेगवेगळ्या देशाचे प्रमुख पाहुणे भारतात येणार आहेत. पण आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन (Joe Biden) यांचाही भारत दौरा अनिश्चितता असल्याचे दिसून येत आहे. याआधी रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन (President Vladimir Putin) , चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग (President Xi Jinping) यांनी भारत दौऱ्यावरून माघार घेतली होती.

जो बायडन यांच्या पत्नी कोरोना पॉझिटीव्ह असल्यामुळे त्यांनी भारत दौरा रद्द केला आहे. त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. अमेरिकेची फास्टर लेडी म्हणून ओळख असलेल्या जिल्ल बायडन (Jill Biden) या कोरोना पॉसिटीव्ह आल्या आहेत. त्यामुळे व्हाईट हाऊसने भारताबाबत कोणतेही वृत्त केले नाही आहे. अमेरिकेचे राष्ट्रअध्यक्ष जो बायडन हे ७ सप्टेंबर रोजी भारतात येणार होते आणि १० सप्टेंबर रोजी पुन्हा अमेरिकेसाठी निघणार होते. पण त्याची पत्नी कोरोना पॉसिटीव्ह आल्यामुळे त्यांनी भारत दौरा रद्द केला आहे. जो बायडन यांनी G २० परिषदेमधून माघार घेल्याने सर्वाना मोठा धक्का बसला आहे. याआधी रशियाचे राष्ट्रपती पुतीन, चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी जी-20 मधून माघार घेतली आहे. बायडन यांनी माघार घेतल्यास तिसऱ्या प्रमुख देशाच्या राष्ट्रप्रमुखांची माघार होईल. या जी-20 परिषदेसाठी फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो, चीनचे पंतप्रधान ली कियांग आणि ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक हे नवी दिल्लीत उपस्थित राहणार आहेत.

या परिषदेमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडन त्यांच्यामध्ये द्विपक्षीय बैठक होण्याची अपेक्षा होती. हे दोन्ही नेते GE फायटर जेट इंजिन करारावर चर्चा करणार होते. या कराराला अमेरिकेने मान्यता दिली होती. या करारामध्ये लहान आकाराच्या अणुभट्ट्या, व्हिसा प्रक्रिया अधिक सुलभ होण्याची चर्चा करण्यात येणार होती. याआधी जून महिन्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि नरेंद्र मोदी यांची भेट झाली होती. तर २०२० मध्ये अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारत दौऱ्यावर आले होते.

Latest Posts

Don't Miss