Friday, April 26, 2024

Latest Posts

Instagram वापरताय? जाणून घ्या सविस्तर माहिती

इंस्टाग्राम (Instagram) हे आताच्या युवकांमध्ये सर्वात लोकप्रिय असलेला सोशल मीडिया प्लॅटफॉर्म (Social Media Platform) आहे. आताच्या डिजिटल (Digital ) युगात सोशल मीडियावर बरेच जण सक्रिय असतात. इंस्टाग्राम हे इंटरनेटच्या मदतीने आपण वापरू शकतो.

इंस्टाग्राम (Instagram) हे आताच्या युवकांमध्ये सर्वात लोकप्रिय असलेला सोशल मीडिया प्लॅटफॉर्म (Social Media Platform) आहे. आताच्या डिजिटल (Digital ) युगात सोशल मीडियावर बरेच जण सक्रिय असतात. इंस्टाग्राम हे इंटरनेटच्या मदतीने आपण वापरू शकतो. या सोशल मीडिया साईट मधून आपण जगभरातील लोकांशी कनेक्ट (Connect) होऊ शकतो. आपल्याला जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात असलेल्या व्यक्तींशी इंस्टाग्रामच्या साहाय्याने संवाद साधता येतो. इंस्टाग्रामवर लोक आपल्या आयुष्यातील आनंदाचे क्षण अथवा काही वेळेस वाईट प्रसंग इतर लोकांसोबत शेअर करतात. इंस्टाग्राम हे मनोरंजनाच्या दृष्टीने वापरले जाणारे साधन आहे. इंस्टाग्रामचा वापर हा फक्त मनोरंजनासाठी नाही तर व्यापार करण्यासाठी देखील केला जातो. बरेच लोक इंस्टाग्रामचा उपयोग करून बऱ्याच गोष्टी विकतात. आजकल इंस्टाग्राम वरून मोठ्या प्रमाणात नफा मिळवता येतो. इंस्टाग्रामचा वापर करून लोकांपर्यंत आपण आपल्या व्यवसाय अथवा स्टार्टप्स (Startups) बद्दल माहिती पोहचवू शकतो. त्याशिवाय इंस्टाग्रामवरून इन्फ्लुएन्सर (Influencer) सुद्धा प्रचंड लोकप्रिय होत आहेत.

इंस्टाग्राम चालू करण्यासाठी सर्वात आधी इंस्टाग्रामवर अकाउंट बनवावे लागते. इंस्टाग्रामच्या अकाउंट्स चे तीन प्रकर आहेत. एक म्हणजे पर्सनल (Personal) दुसरा प्रोफेशनल (professional) आणि तिसरं म्हणजे क्रिएटर (Creator). बहुतांश लोक हे पर्सनल किंवा प्रोफेशनल आकाउंट ठेवण्यास प्राधान्य देतात. पण तुम्हाला या अकाउंट्समधील फरक माहित आहे का? म्हणूनच आज आम्ही तुम्हाला पर्सनल आणि प्रोफेशनल इंस्टाग्राम अकाउंट मधील फरक सांगणार आहोत.

अनेकजण इंस्टाग्रामवर अकाउंट पर्सनल ठेवतात. पर्सनल आकाउंटवर आपण पोस्ट केलेले फोटोज, स्टोरीज हे फक्त आपल्या फोल्लोवर्स ला दिसतात. सहसा या अकाऊंटचा वापर आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणी, नातेवाईक व इतर सहकारी यांच्या संपर्कात राहण्यासाठी होतो. पर्सनल अकाउंटवर आपल्याला रिल्स (Reels), डीएम्स (DM) असे कमी फीचर्स (Features) आपल्याला वापरता येतात. प्रोफेशलनल अकाउंटचा वापर केल्याने आपल्याला अनेक फीचर्स वापरायला मिळतात. चला तर मग जाणून घेऊया प्रोफेशनल अकाउंट चे फायदे.

इंस्टाग्राम इन्साईट्स (Instagram Insight) –

प्रोफेशनल अकाउंटवर आपल्याला इंस्टाग्राम इन्साईट्स हे एक फिचर उपलब्ध होते. या फिचर चा उपयोग प्रामुख्याने व्यवसाय असलेले यूजर्स वापर करतात. या फिचरमुळे आपण पोस्ट केलेल्या फोटोजला त्याचबरोबर व्हिडीओ, रिल्सला किती लाईक्स (Likes), कमेंट्स (Comments) मिळाले हे आपल्याला दिसू शकते. त्याचबरोबर आपण पोस्ट केलेला फोटो, व्हिडीओ, अथवा रील किती जणांपर्यंत पोहोचला आहे हे आपल्याला या फिचरद्वारे समजू शकते. तसेच पोस्ट केलेला फोटो किंवा रील किती महिलांपर्यंत किती पुरुषांपर्यंत पोहोचले आहे हे आपल्याला कळू शकते. याफिचर द्वारे आपल्याला फोटो ज्यांच्यापर्यंत पोहोचला आहे त्यांचे वय त्याचबरोबर राहण्याचे स्थान याबद्दल देखील माहिती मिळते. या माहितीच्या आधारे आपण लोकांपर्यंत पोहचण्यासाठी अजून काय काय करावे लागेल या बद्दल विचार करू शकतो.

बुस्ट पोस्ट (Boost post )

प्रोफेशनल अकाउंटवर आपल्याला बूस्ट पोस्ट हे फिचर मिळते. याच्या साहाय्याने आपण पैसे भरून आपली पोस्ट अथवा आपली जाहिरात जास्तीत जास्त लोकांत[पर्यन्त पोहचवू शकतो. ही जाहिरात आपल्याला कोणत्या लोकांपर्यंत पोहचवायची आहे या हिशोबाने आपण आपल्याला हव्या त्या लोकांपर्यंत पोहचवू शकतो. इंस्टाग्रामवर असलेले अनेक व्यवसाय या फिचर चा मोठ्या प्रमाणावर उपयोग करतात.

इंस्टाग्राम शॉपिंग (Instagram Sgopping)

इंस्टाग्राम शॉपिंगच्या साहाय्याने इंस्टाग्राम यूजर्सना व्यवसाय असलेल्या वेबसाईट वरून सर्व उत्पादने चांगल्या प्रकारे पाहता येऊ शकतात.

ऍड इंस्टाग्राम लिंक व स्टोरीज (Add links on instagram stories)

हा फिचर १०००० पेक्षा जास्त फोल्लोवेर्स असलेल्या प्रोफेशनल अकाउंटवर उपलब्ध होते. या फीचरच्या साहाय्याने आपल्याला स्वाईप अप फिचर उपलब्ध होते. यामुळे यूजर्सना स्वाईप अप करून लगेच लिंक वर जाता येते.

एंटर कॉन्टॅक्ट बटन (Enter Contact button)

तुमचे जर प्रोफेशनल अकाउंट असेल तर तुम्ही त्याला तुमचा फोन नंबर देखील जोडू शकता. फोन नंबरची माहिती मिळाल्याने ग्राहक तुमच्याशी लगेच संपर्क साधू शकता.

हे ही वाचा : 

पगार हातात टिकत नाही? पैशांची बचत करण्यासाठी फॉलो करा ‘या’ टिप्स

Anushka Sharma च्या चित्रपटाचे डायलॉग Virat Kohli ला तोंडपाठ…

Purple Cap आणि Orange Cap वर गुजरातच्या खेळाडूंचा कब्जा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .

Latest Posts

Don't Miss