Valentine Day 2025 Week: ‘व्हॅलेंटाईन डे’ हा दरवर्षी १४ फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. हा दिवस प्रेम, मैत्री आणि आपल्या जवळच्या व्यक्तींप्रति आदर व्यक्त करण्याचा एक खास दिन आहे. आजकाल, या दिवशी प्रिय व्यक्तींना गोड गिफ्ट्स, फुलांचे बुके, प्रेमाच्या शाब्दिक संदेशांसह कर्तव्य व्यक्त केले जाते. अनेक लोक हे दिवस आपल्या कुटुंबीय, मित्र, किंवा जीवनसाथीसोबत आनंदाने साजरे करतात. तसेच प्रेमी युगुल या महिन्याची आतुरतेने वाट पाहत असतात. म्हणूनचं आम्ही तुमच्यासाठी व्हॅलेंटाईन वीकची यादी घेऊन आलो आहोत. जाणून घ्या ‘व्हॅलेंटाईन वीक’ चार्ट.
7 फेब्रुवारी – रोज डे (Rose Day)
‘व्हॅलेंटाईन वीक’ मधला हा पहिला दिवस जो ‘रोज डे’ म्हणून साजरा केला जातो. या दिवशी तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रिणीला, कुटुंबियांना किंवा तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीला गुलाब देऊ शकता. ज्यांच्यासाठी तुमच्या हृदयात अपार प्रेम आहे.
8 फेब्रुवारी – प्रपोझ डे (Propose Day)
‘व्हॅलेंटाईन वीक’ मधला हा दुसरा आहे. या दिवशी, आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी किंवा प्रेमाचे प्रस्ताव देण्यासाठी एक विशेष दिवस असतो. भावना व्यक्त करण्यासाठी ज्या व्यक्तीसोबत तुम्ही खूप दिवसांपासून वाट पाहत आहात त्या व्यक्तीला तुमचे प्रेम व्यक्त करा.
9 फेब्रुवारी – चॉकलेट डे (Chocolate Day)
‘व्हॅलेंटाईन वीक’ मधला हा तिसरा दिवस आहे. या दिवशी, लोक आपल्या प्रिय व्यक्तींना चॉकलेट देऊन प्रेम व्यक्त करतात. चॉकलेट हा एक गोड पदार्थ आहे, जो प्रेमाचे प्रतीक मानला जातो.चॉकलेट भेट देऊन तुमच्या प्रेमाच्या नात्यातला गोडवा वाढवू शकता.
10 फेब्रुवारी – टेडी डे (Teddy Day)
‘व्हॅलेंटाईन वीक’ मधला हा चौथा दिवस आहे. टेडी बेअर हा एक प्रिय आणि गोड उपहार असतो. या दिवशी, लोक आपल्या प्रिय व्यक्तींना टेडी बेअर देऊन त्यांचे प्रेम व्यक्त करतात. त्यामुळे तुम्ही तुमच्या जोडीदाराला एक सुंदर टेडी भेट देऊ शकता.
11 फेब्रुवारी- प्रॉमिस डे (Promise Day)
‘व्हॅलेंटाईन वीक’ मधला हा पाचवा दिवस आहे. या दिवशी,आपले नाते अतूट करण्यासाठी एकमेकांना वचन दिले जाते. प्रेमी जोडपे आणि मित्र एकमेकांना या दिवसाच्यानिमित्ताने काही खास वचन देतात.
12 फेब्रुवारी – हग डे (Hug Day)
‘व्हॅलेंटाईन वीक’ मधला हा सहावा दिवस आहे. या दिवशी, प्रेमी एकमेकांना मिठी मारून आपला स्नेह आणि प्रेम व्यक्त करतात. या दिवशी, शाश्वत प्रेम आणि समर्थन व्यक्त करण्याचा एक साधा, पण प्रभावी मार्ग मानला जातो.
13 फेब्रुवारी – किस डे (Kiss Day)
‘व्हॅलेंटाईन वीक’ मधला हा सातवा दिवस आहे. हा दिवस आपल्या प्रिय व्यक्तीला प्रेमाची, स्नेहाची आणि जवळीकतेची भावना व्यक्त करण्यासाठी एक खास दिवस असतो. लविंग किस देऊन आपले प्रेम साजरे करणे हा या दिवशीचा मुख्य उद्देश आहे.
14 फेब्रुवारी – व्हॅलेंटाईन डे (Valentine’s Day)
‘व्हॅलेंटाईन वीक’ मधला हा खास दिवस आहे. ज्याची प्रेमी युगुल आतुरतेने वाट बघत असतात. व्हॅलेंटाईन डे म्हणजे संपूर्ण आठवड्याचा समारोप. या दिवशी प्रिय व्यक्तींना गोड गिफ्ट्स, फुलांचे बुके, प्रेमाच्या शाब्दिक संदेशांसह प्रेम व्यक्त केले जाते.
हे ही वाचा :
“पक्षाने अपमानित केल्याची त्यांची…”Praful Patel यांचे भुजबळांविषयीचे वक्तव्य