वंदे भारत (Vande Bharat) ट्रेनला देशभरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. ती देशाच्या विविध भागातून धावत आहे. या एक्स्प्रेसच्या प्रवास सुखकर आणि आरामदायी आहे. सध्या चालू असलेल्या वंदे भारत एक्सप्रेसमध्ये फक्त बैठी अशी व्यवस्था करण्यात आली आहे. पण आता प्रवाशांसाठी या ट्रेनमध्ये स्लीपर कोच देखील करण्यात येणार आहे. त्यामुळे या ट्रेनचा प्रवास अजूनच आरामदायी आणि सुखकर होणार आहे. याशिवाय वंदे भारत मेट्रो (Vande Bharat Metro) देखील लवकरच चालू करण्यात येणार आहे.
भारतातील वेगवेगळ्या शहरात धावत असलेल्या वंदे भारत ट्रेनला नागिकांनी खूप पसंती दाखवली आहे. ही ट्रेन भारताच्या वेगवेगळ्या शहरातुन धावत आहे. यावर बोलताना इंटिग्रल कोच फॅक्टरी महाव्यवस्थापक बीजी मल्ल्या म्हणाले, ते या आर्थिक वर्षातच वंदे भारतची स्लीपर आवृत्ती लाँच करतील. या आर्थिक वर्षात वंदे मेट्रोही सुरू होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यानंतर पुढे मल्ल्या म्हणाले की, नॉन-एसी प्रवाशांसाठी ३१ ऑक्टोबर रोजी नॉन-एसी पुश पुल ट्रेन सुरू केली जाईल. यात २२ कोच आणि एक लोकोमोटिव्ह असेल. वंदे भारत स्लीपर ट्रेनचे कोच देखील बनवीन तयार झाले आहेत. त्याचबरोबर मेट्रो ट्रेनचे डबेही तयार केले जात असल्याची माहिती त्यांनी दिली. नवीन लाँच होणाऱ्या वंदे भारत ट्रेनला १६ डब्बे असणार आहेत. ज्यामध्ये ११ डबे ३ टायर कोच, ४ डबे २ टायर कोच आणि १ फर्स्ट टायर कोच असतील. ही ट्रेन एक हजार किलो पेक्षा जास्त अंतरावर धावेल. ही ट्रेन बनवून तयार झाल्याचं महाव्यवस्थापक बीजी मल्ल्या म्हणाले. तर ही स्लीपर कोच ट्रेन ३१ मार्च २०२४ पूर्वी सुरू होईल, असंही त्यांनी सांगितलं.
सध्या देशभरात वंदे भारत ट्रेन ही दोन रंगांमध्ये आहे. आधी पांढऱ्या आणि निळ्या रंगात आणि नंतर केशरी रंगात ती सादर करण्यात येईल.मल्ल्या म्हणाले की, आता वंदे भारत स्लीपर ट्रेन या व्यतिरिक्त कोणत्याही नवीन रंगात आणली जाणार नाही. ही फक्त आहे त्या जुन्या रंगांत सादर केली जाईल. वर्षाच्या अखेरीस वंदे मेट्रो ट्रेन देखील सुरू होणार असल्याचं मल्ल्या म्हणाले. जानेवारी आणि फेब्रुवारीदरम्यान वंदे मेट्रो लाँच करण्यात येईल, असंही ते म्हणाले.
हे ही वाचा:
राजू शेट्टी यांनी सरकारला दिला इशारा