Wednesday, November 29, 2023

Latest Posts

Traffic Rules: नियमभंग केल्यास भरावा लागेल ‘इतका’ दंड

एखाद्या व्यक्तीची गाडी विना परवाना दुसरी व्यक्ती चालवत असेल तर अशा व्यक्तीला ३ महिन्याचा कारावास किंवा १००० रुपयांचा दंड भरावा लागतो. वाहन कायदा १९९६ नुसार विमा न उतरवले वाहन कोणी चालवताना आढळले तर अशा व्यक्तीला ३ महिन्यांच्या कालावधीपर्यंतचा कारावास किंवा १००० रुपयांचा दंड किंवा दोन्ही दिल्या जाऊ शकतात. 

तुम्ही ऑफिसला जाण्यासाठी घाई-घाईत निघता, तुमच्या बाईक किंवा स्कुटीला किक मारून सुसाट गाडी पळवत असताना नेमकी त्याचवेळी ट्रॅफिक पोलिसांकडून तुमची गाडी अडवली जाते आणि कागदपत्रांची मागणी केली जाते. एकत्र आधीच घाई त्यात पोलिसांनी केलेली कागदपत्रांची मागणी त्यात तुम्ही गोंधळून जाता. कागदपत्र असतील तर ठीक पण नसतील तर पोलिसांकडून RC बुकची मागणी केली जाते. जर तुमच्याकडे ते ही नसेल, तर मग पोलीस गाडीचा विमा किंवा मग पीयुसी (PUC) प्रमाणपत्र मागतात. जर तुमच्याकडे यापैकी कोणतीही गोष्ट, कोणतेही कागदपत्र नसेल तर मात्र, १८० वाहन कायद्याअंतर्गत, एखाद्या व्यक्तीची गाडी विना परवाना दुसरी व्यक्ती चालवत असेल तर अशा व्यक्तीला ३ महिन्याचा कारावास किंवा १००० रुपयांचा दंड भरावा लागतो. वाहन कायदा १९९६ नुसार विमा न उतरवले वाहन कोणी चालवताना आढळले तर अशा व्यक्तीला ३ महिन्यांच्या कालावधीपर्यंतचा कारावास किंवा १००० रुपयांचा दंड किंवा दोन्ही दिल्या जाऊ शकतात.

एखाद्या वेळेस तुम्ही तुमची कागदपत्रे जर घरी विसरलात, तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स (Driving License) जर तुमच्याकडे नसेल तर घाबरण्याचं काही कारण नाही. यासाठी आधीच तुम्ही तुमची कागदपत्रे तुमच्या मोबाईलमध्ये स्कॅन करून ठेवा. त्यासोबतच, तुमच्या गाडीशी संबंधित असलेल्या कागदपत्रांची सॉफ्ट कॉपी तुम्ही पोलिसांना दाखवू शकता. सीटबेल्ट न लावल्यास १००० रुपयांचा दंड, दुचाकीवर ३ जणांनी प्रवास केल्यास पहिल्या वेळेस ५०० रुपये आणि दुसऱ्या वेळेस १५०० रुपये, नंबर प्लेटशिवाय गाडी चालवल्यास पहिल्या वेळेस ५०० रुपये आणि दुसऱ्या वेळेस १५०० रुपये, हेल्मेटशिवाय गाडी चालवल्यास १००० रुपयांचा दंड, विमा नसलेले वाहन चालवल्यास २००० रुपयांचा दंड तर १८ वर्षांच्या आतील व्यक्तीने गाडी चालवल्यास तब्बल २५००० रुपयांचा दंड ट्रॅफिक पोलिसांकडून आकारण्यात येतो. म्हणून, होणारी कारवाई आणि आकारण्यात येणार दंड यापासून वाचायचे असेल तर तुमच्या मोबाईलमध्ये सर्व कागदपत्रांची सॉफ्ट कॉपी ठेवा आणि इतर वाहतुकीचे नियम पाळून स्वतःला सुरक्षित करा.

हे ही वाचा : 

‘बिग बॉस’च्या घरात अंकिता लोखंडे आणि विकी जैनमध्ये वाद

संजय राऊत यांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल, मुख्यमंत्री भाजपची भांडी घासतात…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss