महाराष्ट्रात कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणे दिवसेंदिवस कठीण होत चालेले आहे . प्रत्येक कंपनीमध्ये कर्मचाऱ्यांकडून चांगल्यातले चांगले काम करून पाहिजे असतात. अशा वेळी कर्मचाऱ्यांना प्रत्येकावर एक जबाबदारी दिली असते. पण सर्वच कामगार जीव तोडून मेहनत घेत असतात. पण कधी कधी असे वाटते महिनाभर सुट्टी घेऊन नुसता आराम करावा . पण हे अनेकदा शक्य होत नाही. कारण कंपनीमध्ये कामाचा टार्गेट असतो. या टार्गेटच्या नादात कर्मचाऱ्यांची फार वाईट अवस्था होऊन जाते. सोशल माडियावर एक भारतीय वंशाच्या सीईओने त्यांच्या कंपनीच्या वर्क कल्चरबाबत एक पोस्ट केली आहे. साध्य सोशल मीडियावर खूप चर्चा होत आहे. अनेकांनी ती पोस्ट वाचुन संताप व्यक्त केला आहे, तर काहींनी चक्क या सीईओला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचा दावा केला आहे.
त्यामध्ये Graptile या एआय स्टार्टअपचे सीईओ दक्ष गुप्ता यांनी त्यांच्या कंपनीतील वर्क कल्चरबाबत ही पोस्ट केली आहे. तसेच त्यांनी सांगितले आहे की, त्यांच्या कंपनीत ८४ तासांचा वर्क वीक आहे. वर्क लाइफ बॅलेन्सला इथे जागा नाही. गुप्ता यांनी पोस्ट लिहिले की, त्यांच्या कंपनीत सकाळी ९ वाजल्यापासून काम सुरु होते आणि रात्री ११ वाजेपर्यंत काम असते. कंपनीतील वातावरण अतिशय तणावपूर्व असते, जेथे कर्मचारी केवळ कामावर लक्ष केंदित करतात. त्यांना शनिवारी सुट्टी नसते काही वेळी रविवारीही काम करावे लागते. आम्ही मुलाखतीच्या पाहिल्यात टप्यात उमेदवारांना स्पष्टपणे सांगतो की, आमच्या कंपनीत वर्क लाईफ बॅलेन्सला वाव नाही, पूर्वी हे सांगणे विचित्र वाटायचे, पण आता अशी जबाबदारी असणे योग्य वाटते.
दक्ष गुप्ता यांची ही एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे , ज्याला दहा लाखांहून जास्त व्ह्यूज मिळाले. यावर पोस्टवरून वाददेखील रंगले आहे. काहींनी त्यांच्या कंपनीतील पारदर्शक कारभाराचे कौतुक केले, काहींनी हे टॉक्सिक वर्क कल्चर असल्याचे म्हटले आहे. या सर्व टीकेनंतर दक्ष गुप्ता यांनी आणखी एक पोस्ट केली आहे, ज्यात त्यांनी पोस्ट केली आहे. ज्यात त्यांनी दावा केला की, आता त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. त्यांनी म्हटले की, माझ्या इनबॉक्समध्ये २० टक्के जीव मारण्याच्या धमक्या आणि ८० टक्के नोकरीचे अर्ज येत आहेत. अलीकडे इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांनी कामाच्या काही वेळेनुसार एक विधान केलं होते. ज्यामध्ये त्यांनी दिवसाचे १४ तास आणि आठवड्यातून ८० तासांपेक्षा जास्त काम केले पाहिजे असे म्हटले होते, यावरून सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली होती.
हे ही वाचा:
मनोज जरांगेनी सांगितले, विधानसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाला किंवा अपक्षाला पाठिंबा…
अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांना दिले थेट आव्हान…, म्हणाले…