Saturday, June 3, 2023

Latest Posts

बारावी नंतर टीव्हीवर झळकण्याची इच्छा? हा कोर्स ठरेल उत्तम पर्याय

बारावीनंतर मुल नेहमी करिअर च्या विचारांनी गोंधळून जातात. प्रत्येक मुलांची आवड ही वेगवेगळी असते. काही मुलांना वकील बनायचे असते.

बारावीनंतर मुल नेहमी करिअर च्या विचारांनी गोंधळून जातात. प्रत्येक मुलांची आवड ही वेगवेगळी असते. काही मुलांना वकील बनायचे असते. काही मुलांना इंजिनिअर बनायचे असते काही जणांना पत्रकार बनायचे असते. पत्रकारितेची तसेच टिव्ही इंडस्ट्री मध्ये काम करण्याची अनेकांना इच्छा असते. त्यासाठी बी ए एम एम सी ( B.A.M.M.C) नावाचा पदवीधर कोर्स हा एक उत्तम पर्याय आहे. या कोर्स मध्ये तुम्हाला पत्रकारिता आणि त्याच बरोबर जाहिरातीचे सुद्धा ज्ञान मिळेल. चला तर मग या कोर्स विषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊया.

बी ए एम एम सी (B.A.M.M.C) कोर्स ची थोडक्यात माहिती

बी ए एम एम सी (B.A.M.M.C) या कोर्स चे संपूर्ण रूप हे बॅचलर ऑफ आर्टस् इन मल्टिमीडिया अँड मास कम्युनिकेशन (Bachelor of Arts in Multimedia and Mass Communication) आहे. बी ए एम एम सी (B.A.M.M.C) ह्या कोर्सचा कालावधी हा तीन वर्षांचा असून हा कोर्स बऱ्याच कॉलेज मध्ये उपलब्ध आहे. ह्या कोर्स मधून आपल्याला पत्रकारिते सोबतच जाहिरातीचे देखील ज्ञान मिळते. बी ए एम एम सी (B.A.M.M.C) हा कोर्स बारावी नंतर केला जातो. ज्या विद्यार्थांना मीडियामध्ये तसेच मीडिया संबंधित क्षेत्रात काम करण्याची इच्छा असेल त्या विध्यार्थ्यांसाठी हा कोर्स उपयुक्त आहे. या कोर्सच्या साहाय्याने टीव्ही, रेडिओ, वृत्तपत्र, डिजिटल मीडिया इत्यादि गोष्टींचे ज्ञान मिळते.

बी ए एम एम सी (B.A.M.M.C) कोर्सची प्रवेश प्रक्रिया:

या कोर्स साठी प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी बारावी उत्तीर्ण झालेले पाहिजेत. त्याचबरोबर काही कॉलेजेस मध्ये प्रवेश घेण्यासाठी प्रवेश परीक्षेचे आयोजन केले जाते. बी ए एम एम सी साठी प्रवेश घेण्यासाठी बारावीत किमान ५०% गुणांची आवश्यकता आहे. सर्वप्रथम कॉलेज मध्ये जाऊन या कोर्सच्या प्रवेशासाठी प्रवेश फॉर्म भरावा. त्यानंतर कॉलेजची मेरिट यादी जाहीर झाल्यावर त्या मेरिट लिस्ट (Merit List) मध्ये तुमचे नाव असल्यास पुढील प्रकिया चालू होतील. प्रत्येक कॉलेजची वेगवेगळी पद्धत असते.

बी ए एम एम सी (B.A.M.M.C) कोर्स पूर्ण झाल्यावर करिअर च्या संधी

बी ए एम एम सी (B.A.M.M.C) कोर्स मध्ये मीडिया संबंधित अनेक गोष्टींचे आपल्याला ज्ञान मिळते. या मध्ये आपल्याला पत्रकारितेसोबतच फिल्ममेकिंग (Filmmaking), फोटोग्राफी (Photography), ग्राफिक डिझायनिंग (Graphic Designing) कन्टेन्ट रायटिंग (Content writing ) असे अनेक विषयांचे सखोल ज्ञान मिळते. त्यामुळे हा कोर्स पूर्ण केल्यावर तुम्हाला पत्रकार (Journalist) , न्यूज अँकर (News anchor), छायाचित्रकार (Photographer), सामग्री लेखक (Content writer), इलस्ट्रेटर (Illustrator), चित्रपट दिग्दर्शक (Film Director) इत्यादिं मध्ये आपले करिअर बनू शकते.

हे ही वाचा : 

सीईटी परीक्षांचे निकाल जाहीर, प्रवेश फेरीचे वेळापत्रक होणार लवकरच जाहीर

१२ वी नंतर करा हा कोर्स; प्रवेश प्रक्रियेपासून करिअरच्या संधी पर्यंत मिळवा संपूर्ण महिती

अवघ्या काही तासांत लागणार HSC चा निकाल, विद्यार्थ्यांची उत्सुकता शिगेला

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .

Latest Posts

Don't Miss