Wednesday, April 24, 2024

Latest Posts

Watch Video, Odisha Train Accident नंतर तब्ब्ल ५१ तासानंतर पहिली ट्रेन धावली, अन् रेल्वेमंत्र्यांनी जोडले हात

काल दिनांक ४ जून रोजी रात्री १०.४० मिनिटांच्या सुमारास बालासोर या मार्गावरून पहिली ट्रेन ही धावली ज्या ट्रॅक वर अपघात झाला त्याच ट्रॅक वरून ही ट्रेन धावली आहे.

शुक्रवार दिनांक २ जून रोजी ओडिशातील (Odisha) बालासोर येथे संध्याकाळी एक मोठा रेल्वे अपघात झाला. मालगाडी, कोरोमंडल एक्स्प्रेस (Coromandel Express) आणि हावडा एक्स्प्रेस (Howrah Express) या तीन गाड्यांची धडक होऊन हा अपघात झाला. या अपघातामध्ये जवळपास २७५ नागरिकांचा मृत्यू तर ९०० हून अधिक नागरिक हे जखमी झाले होते. या ठिकाणी मोठ्या शर्तीने बचावकार्य हे सुरु होते. परंतु आता या अपघातानंतर तब्बल ५१ तासानंतर तिथे पहिली ट्रेन धावली आहे.

काल दिनांक ४ जून रोजी रात्री १०.४० मिनिटांच्या सुमारास बालासोर या मार्गावरून पहिली ट्रेन ही धावली ज्या ट्रॅक वर अपघात झाला त्याच ट्रॅक वरून ही ट्रेन धावली आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्वतः मालगाडीला हिरवा झेंडा दाखवला आणि यावेळी अनेक माध्यमे आणि रेल्वे अधिकारी देखील उपस्थित होते. मालगाडी विशाखापट्टणम बंदरातून राउरकेला स्टील प्लांटकडे जात होती.

 तसेच रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ट्विट केले की, “खराब झालेली डाऊन लाईन पूर्णपणे पूर्ववत करण्यात आली आहे. विभागातून पहिली ट्रेन निघाली.” काही वेळाने त्यांनी ट्विट करून सांगितले की, अप-लाइनवरही ट्रेनची वाहतूक सुरू झाली आहे. ५१ तासांनंतर निघालेल्या या पहिल्या ट्रेनचा व्हिडिओ समोर आला आहे त्याचसोबत हा व्हिडिओ अध्या ओशाळ मीडियावर तुफावर व्हायरल हा होत आहे. या व्हिडीओमध्ये रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णवही उभे असल्याचं दिसत आहेत. बहंगा रेल्वे स्थानकावरून ट्रेन जाताच रेल्वेमंत्र्यांनी हात हलवून अभिवादन केले. यानंतर तो हात जोडून प्रार्थना करताना दिसत आहे. रेल्वेमंत्र्यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवरून व्हिडिओही शेअर केले आहेत. एका व्हिडिओमध्ये ते ‘भारत माता की जय’ आणि ‘वंदे मातरम’चा नारा देताना आणि लोकांचे आभार मानताना दिसत आहे.

विशेष म्हणजे, कोरोमंडल एक्स्प्रेस शुक्रवारी संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास बालासोर येथील बहनगा बाजार रेल्वे स्थानकाजवळ मुख्य मार्गाऐवजी लूप लाइनमध्ये घुसल्यानंतर तेथे उभ्या असलेल्या मालगाडीला धडकली. या अपघातात बेंगळुरू-हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेसचाही अपघात झाला. या अपघातात २७५ जणांचा मृत्यू झाला आहे.

हे ही वाचा:

World Bycycle Day का आणि कधी साजरा केला जातो? वाचा सविस्तर…

‘या’ ५ संकल्पांचे करा पालन आणि World Enviroment Day 2023 करा साजरा…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss