spot_img
Thursday, December 5, 2024
spot_img

Latest Posts

Gautam Adani यांचं नेकम प्रकरण काय? प्रकल्प भारताचा, लाच भारतीय अधिकाऱ्यांना मग अदानींवर अमेरिकेत का दाखल झाला खटला ?

Gautam Adani Birbery case : भारतामधील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत आणि उद्योजक व्यक्ती गौतम अदानी यांच्यावर अमेरिकेत गुन्हा दाखल झाला. उद्योजक गौतम अदानी यांच्यावर अटक वॉरंट बजावण्यात आला आहे. आता गौतम अदानी यांना अमेरिकन न्यायालयात आपल्या वकिलांकडून बाजू मांडावी लागणार आहे. या प्रक्रिये नंतर त्यांचे अटक वॉरंट रद्द होऊ शकतो. तसेच हे अटक वॉरंट अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष जो. बाइडेन यांना देखील रद्द करण्याचा अधिकार आहे. उद्योजक गौतम अदानी यांच्यावर असा आरोप आहे की एक प्रकल्प मिळवण्यासाठी त्यांनी लाच दिली आहे. हा आरोप अमेरिकेत झाला आहे. मात्र ही लाच भारतीय अधिकाऱ्यांना दिली असून. मात्र असा प्रश्न उपस्थित झाला आहे प्रकल्प भारताचा, लाचही भारतीय अधिकाऱ्यांना दिली, मग अदानी यांच्यावर गुन्हा अमेरिकेत का दाखल झाला?

अदानी यांचं नेकम प्रकरण काय
गौतम अदानी यांच्या विरोधात न्यूयॉर्कमधील फेडरल कोर्टात अटक वॉरंट जारी केले आहे. तसेच न्यूयॉर्कच्या न्यायालयात एक खटला दाखल केला आहे. ते रक प्रकारचे चार्जशीट आहे. त्यामध्ये अदानी ग्रुपचे चेअरमन गौतम अदानी, त्यांचे पुतणे सागर अदानी यांच्यासह आठ जणांना आरोपी केले गेले आहे. त्यात आरोप आहे की, भारतामधील एक सोलर एनर्जी प्रकल्प मिळवण्यासाठी त्यांनी सरकारी अधिकाऱ्यांना २२०० कोटी रुपयांची लाच दिली.

अमेरिकेत का दाखल झाला खटला
गौतम अदानी यांच्यावर हा आरोप अमेरिकेतील सिक्योरिटी एंड एक्सचेंज कमीशन (SEC) ने लावला. त्या केलेल्या आरोपानुसार गौतम अदानी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही लाच यासाठी दिली की, पुढील २० वर्षांमध्ये त्यांना या प्रकल्पाच्या माध्यमातून १७ हजार कोटी रुपयांचा नफा होणार आहे. हा प्रकल्प भारतामधील आहे. लाच घेणारे आणि लाच देणार व्यक्ती भारतीय आहे. मग अमेरिकेमध्ये खटला का दाखल करण्यात आला? याचे कारण म्हणजे या प्रकल्पामध्ये अमेरिकन गुंतवणूकदारांची गुंतवणूक होती. तसेच त्यांच्यापासून ही माहिती लपवण्यात आली. यामुळे अमेरिकेच्या न्यायलायत याचिका दाखल झाली आणि यामुळे उद्योजक गौतम अदानी आणि इतरांवरही अटक वॉरंट बजावण्यात आले.

हे ही वाचा:

Vidhansabha Election: विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी राज्यात दुपारी ३ वाजेपर्यंत ४५.५३  टक्के मतदान

Vidhansabha Election: विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी राज्यात सकाळी ११ वाजेपर्यंत १८.१४% मतदान

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss