Thursday, November 30, 2023

Latest Posts

देशातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याचे दर काय?

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव ०.०५ टक्क्यांनी वाढून १,९७०.५० डॉलर प्रति औंस इतका आहे. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात देखील सोन्याचा भाव वाढला आहे. आज चांदीच्या दरात ०.३३ टक्क्यांनी घसरण होऊन २३.५८ डॉलर प्रति औंसवर व्यवहार होत आहे.

भारतात सध्या सणासुदीचे दिवस चालू आहेत तर नुकताच दसरा पार पडला, आणि पुढे काही दिवसात दिवाळी ची तयारी चालू होईल, दिवाळी हा खूप मोठा सॅन असून या दिवसात लोकं आवर्जून सोनं खरेदी करतात. पण जर तुम्ही आज सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्या खिशाला चांगलीच कात्री बसेल. याचं कारण, मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (multi commodity exchange) सोन्याच्या दरात वाढ झाली आहे.सुरुवातीच्या टप्प्यात सोन्याचा वायदा बाजार ६० हजार ४७८ रुपये प्रति १० ग्रॅमवर उघडण्यात आला.त्यानंतर किमतीत थोडी वाढ नोंदवण्यात आली. गेल्या काही दिवसांच्या तुलनेत सोन्याच्या दरात १७ रुपयांची म्हणजेच ०.०३ टक्क्यांची वाढ झाली आहे. सध्या सोन्याचा दर हा ६० हजार ५५४ रुपये प्रति १० ग्रॅम आहे. सोनेच नाही तर चांदीच्या दारातही वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. आज सुरुवातीच्या टप्प्यात चांदी ७१ हजार ६२९ रुपये प्रति किलोच्या पातळीवर उघडण्यात आली. कालच्या तुलनेत १५४ पैसे किंवा ०.०२ टक्के च्या वाढीसह ती ७१ हजार ८०० रुपयांवर पोहोचली आहे. सोमवारी चांदी ७१ हजार ७८६ रुपये प्रति किलो (चांदीची किंमत आज) या पातळीवर बंद झाली.

जाणून घ्या आजचे देशातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याचे दर काय?
१. मुंबई – २४ कॅरेट सोने ६१,८००रुपये, चांदी ७५,१०० रुपये प्रति किलो
२. पुणे – २४ कॅरेट सोने ६१,८०० रुपये, चांदी ७५,१०० रुपये प्रति किलो
३. कोलकाता – २४ कॅरेट सोने ६१,८०० रुपये, चांदी ७५,१०० रुपये प्रति किलो
४. चेन्नई- २४ कॅरेट सोने ६१,६९० रुपये, चांदी ७७,५०० रुपये प्रति किलो
५. गाझियाबाद- २४कॅरेट सोने ६१,९५० रुपये, चांदी ७५,१०० रुपये प्रति किलो
६. नोएडा – २४ कॅरेट सोने ६१,९५० रुपये, चांदी ७५,१०० रुपये प्रति किलो
७. जयपूर – २४ कॅरेट सोने ६१,९५०रुपये, चांदी ७५,१०० रुपये प्रति किलो
८. दिल्ली – २४कॅरेट सोने ६१,८००रुपये, चांदी ७५,१०० रुपये प्रति किलो

आंतरराष्टीय बाजारात देखील सोन्या चांदीच्या दरात वाढ
सोन्या-चांदीच्या किंमतीत देशांतर्गत भागात किंचित वाढ झालेली आहे. त्यासोबत आंतरराष्ट्रीय बाजारात देखील सोन्या चांदीच्या दरात तेजी दिवून येत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव ०.०५ टक्क्यांनी वाढून १,९७०.५० डॉलर प्रति औंस इतका आहे. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात देखील सोन्याचा भाव वाढला आहे. आज चांदीच्या दरात ०.३३ टक्क्यांनी घसरण होऊन २३.५८ डॉलर प्रति औंसवर व्यवहार होत आहे.

Latest Posts

Don't Miss