Friday, December 1, 2023

Latest Posts

ONLINE PAYMENT करतांना किती रुपयांची मर्यादा असते?

नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NATIONAL PAYMENT CORPORATION OF INDIA) ने यूपीआय (UPI) द्वारे एका दिवसात पैसे ट्रान्सफर करण्याची मर्यादा निश्चित केली आहे. नवीन मार्गदर्शक तत्त्वानुसार यूपीआय द्वारे एका दिवसात फक्त एक लाख रुपये ट्रान्सफर करता येतात. याशिवाय किती रक्कम हस्तांतरित केली जाऊ शकते, हे बँक आणि वापरत असलेल्या ॲपवर अवलंबून असते.

मागील काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात ऑनलाईन पेमेंट (ONLINE PAYMENT) करण्याचे प्रमाण वाढले आहे. भारतातील अनेकजण रोख रकमेपेक्षा मोबाईलमध्येच, मोबाईलच्या ऑनलाईन माध्यमांमध्ये पैसे ठेवतात. ऑनलाईन पेमेंटच्या मार्फत ग्राहक विक्रेत्याला पैसे देतात. गुगल पे (GOOGLE PAY), फोन पे (PHONE PE), ऍमेझॉन पे (AMAZON PAY), पेटीएम (PAYTM) या ॲप्सद्वारे पैसे ट्रान्सफर करणे सोपे जात आहे. खर्च छोटा किंवा मोठा असो, नागरिक ऑनलाईन पेमेंटचा वापर करत आहेत. जर तुम्ही देखील यूपीआय द्वारे पेमेंट करत असाल तर ऑनलाइन ॲपमधून एका दिवसाला किती पैसे ट्रान्सफर करता येतात, याबद्दल आपण जाणून घेऊया.

नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NATIONAL PAYMENT CORPORATION OF INDIA) ने यूपीआय (UPI) द्वारे एका दिवसात पैसे ट्रान्सफर करण्याची मर्यादा निश्चित केली आहे. नवीन मार्गदर्शक तत्त्वानुसार यूपीआय द्वारे एका दिवसात फक्त एक लाख रुपये ट्रान्सफर करता येतात. याशिवाय किती रक्कम हस्तांतरित केली जाऊ शकते, हे बँक आणि वापरत असलेल्या ॲपवर अवलंबून असते.

गुगल पे (GOOGLE PAY) : 

तुम्हाला युपीआय द्वारे एका दिवसात एक लाख रुपयांपर्यंत पेमेंट करण्याची परवानगी देईल. जीपे एका दिवसात दहापेक्षा जास्त व्यवहार करण्याची परवानगी देणार नाही, याचा अर्थ असा की तुम्ही एक लाख रुपयांचा एक व्यवहार करू शकता किंवा तुम्ही वेगवेगळ्या रकमेचे फक्त दहा व्यवहार करू शकता.

पेटीएम (PAYTM) : 

नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या नवीन नियमानंतर पेटीएम तुम्हाला यूपीआय द्वारे एका दिवसात एक लाख रुपयांपर्यंत पेमेंट करण्याची परवानगी देईल, याशिवाय युजसर्वर ऑनलाइन पेमेंट संबंधित कोणतेही बंधन असणार नाही.

फोन पे (PHONE PE) :

फोन पे द्वारे एका दिवसात एक लाख रुपये ट्रान्सफर करता येतात. या ॲपच्या वापर कर्त्यावर इतर कोणत्याही प्रकारचे निर्बंध घालण्यात आले नाही.

ॲमेझॉन पे (AMAZON PAY) :

ॲमेझॉन पे द्वारे एका दिवसात एक लाख रुपयांपर्यंत पेमेंट करता येते. हे ॲप वापर करताना एका दिवसात २० व्यवहार करण्याची परवानगी देते.

हे ही वाचा : 

“ते झेरॉक्स सेंटर विद्यापीठाचंच”, युवा सेनेच्या आरोपांवर विद्यापीठ प्रशासनाचे स्पष्टीकरण

‘ या ‘ नेत्यांनकडे अमली पदार्थांचं लायसन्स – मंत्री सुधीर मुनगंटीवारांचा दावा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss