Thursday, April 18, 2024

Latest Posts

World Enviroment Day साजरा करण्यामागील काय आहे कारण ? जाणून घ्या इतिहास, महत्व आणि थीम…

जागतिक पर्यावरण दिन (World Environment Day) हा दिवस म्हणजे सत्तरच्या दशकात सुरु झालेली संयुक्त राष्ट्राची सर्वात मोठी जागरूकता मोहीम आहे.

जागतिक पर्यावरण दिन (World Environment Day) हा दिवस म्हणजे सत्तरच्या दशकात सुरु झालेली संयुक्त राष्ट्राची सर्वात मोठी जागरूकता मोहीम आहे. पर्यावरण हे आपल्यासाठी तसेच आपल्या भविष्यासाठी फार महत्वाचे आहे. म्हणूनच जागतिक पर्यावरण दिन जागतिक पातळी वर साजरा करतात. जागतिक पर्यावरण दिन जगभरात दरवर्षी ५ जून रोजी साजरा केला जातो. पर्यावरणाचे संरक्षण करणारे व त्याची काळजी घेणारे अनेक पर्यावरणवादी घटक, संघटना, पर्यावरण प्रेमींकडून हा दिवस उत्सवात साजरा केला जातो.

जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्याचा निश्चय १९७२ मध्ये स्टॉकहोम येथे झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या मानवी पर्यावरण परिषदेत झाला. संयुक्त राष्ट्रांची ही परिषद तब्बल १२ दिवस चालली. ५ जून ते १६ जून असा या परिषदेचा कालावधी होता. तेव्हापासून प्रत्येकवर्षी ५ जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा करण्यात येतो.

पर्यावरणामुळेच प्रत्येक सजीवाचे जीवन शक्य आहे. जागतिक पातळीवर पर्यावरण दिन साजरा करण्याचा मुख्य उद्धेश पर्यावरणाशी संबंधित समस्यांना मानवी चेहरा देण्यासोबतच, लोकांमध्ये पर्यावरणाबाबत जागरुकता निर्माण व्हावी हा आहे. लोकांमध्ये पर्यावरणप्रति जागरूकता निर्माण होण्यासाठी संयुक्त राष्ट्रांद्वारे आयोजित केला जाणारा हा जाकतीक पातळीवर सर्वात मोठा कार्यक्रम आहे. प्रत्येक वर्षी जागतिक पर्यावरण दिन हा विशिष्ठ थीम द्वारे साजरा केला जातो. मागील वर्षाची म्हणजेच जागतिक पर्यावरण दिन २०२२ ची थीम ‘केवळ एकच पृथ्वी’ (Only One Earth) ही होती.

सध्या पृथ्वीवर तसेच पर्यावरणात प्लास्टिक प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यावरच मात करण्यासाठी व लोकांमध्ये या संनबंधित जनजागृती करण्यासाठी
संयुक्त राष्ट्रांद्वारे ‘जागतिक पर्यावरण दिन २०२३’ ची थीम “बीट प्लास्टिक प्रदूषण” (#BeatPlasticPollution) ही ठेवण्यात आली आहे. जागतिक पर्यावरण दिन २०२३ चे आयोजन पश्चिम आफ्रिकेतील आयव्हरी कोस्ट (Ivory Coast) या नावाने ओळखल्या जाणार्‍या कोट डी’आयव्होरी (Cote d’Ivoire) या देशाद्वारे केले जात आहे. नेदरलँड्स यावर्षी त्याचा भागीदार असेल. कोट डी’आयव्होरने यापूर्वीच प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घातली आहे.

हे ही वाचा:

घरच्या घरी बनवा Hotel Style Chiken Momos, स्पेशल रेसिपी फक्त तुमच्यासाठी…

५ जूनला होणार केरळमध्ये मान्सूनचे आगमन

कोण होत्या Sulochana Latkar ?, सुलोचना दीदींचा जीवनप्रवास…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss