spot_img
Thursday, March 20, 2025

Latest Posts

जागतिक स्वयंसेवी संघटना दिन म्हणजे काय आणि हा दिवस का साजरा केला जातो; जाणून घ्या माहिती

जागतिक स्वयंसेवी संघटना दिन (Global NGO Day) २७ फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. हा दिवस विविध स्वयंसेवी संघटनांच्या कार्याचा आदर आणि त्यांचा समाजातील महत्त्वपूर्ण रोल ओळखण्यासाठी साजरा केला जातो. स्वयंसेवी संस्था (NGOs) आणि त्या संघटनेचे सहकारी जगभरात सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि पर्यावरणीय समस्यांवर काम करत असतात. या दिवसाच्या निमित्ताने स्वयंसेवी संघटनांचे योगदान आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचे महत्त्व कुटुंब, समुदाय, आणि जागतिक स्तरावरच्या समस्यांवर काम करत त्यांना मदत करणे. अपरिचितांसाठी, स्वयंसेवी संस्था समाजात महत्त्वाची भूमिका बजावतात. या संस्था समस्या सोडवण्याव्यतिरिक्त, ते गरजूंना आर्थिक, शारीरिक आणि मानसिक मदत देखील प्रदान करतात.

जागतिक स्वयंसेवी संस्था दिन सर्वात प्रथम डेन्मार्क, एस्टोनिया, फिनलंड आणि जर्मनी या देशांनी साजरा करण्यासाठी मान्यता दिली. २०१२ मध्ये पहिल्यांदाच जागतिक स्वयंसेवी संस्था दिन साजरा करण्यात आला. २०१४ मध्ये, संयुक्त राष्ट्र आणि युरोपियन युनियनच्या नेत्यांनी कार्यक्रमांना उपस्थित राहून या दिवसाचे स्वागत केले. स्माईल फाउंडेशन ही नवी दिल्लीस्थित स्वयंसेवी संस्था वंचित मुले, तरुण आणि महिलांसाठी एक आशादायक भविष्य निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवते. या संस्थेने देशभरातील अनेक मुलांचे भविष्य घडवले आहे. दुर्गम गावे आणि झोपडपट्टी भागात शिक्षण, आरोग्यसेवा, उपजीविका आणि महिला सक्षमीकरणावर कल्याणकारी प्रकल्प देखील चालवले आहेत. जगभरात ८९ देशांमध्ये हा दिवस साजरा केला जातो. आपल्या भारतातही मोठमोठ्या स्वयंसेवी संस्था हा दिवस साजरा करतात.

जागतिक स्वयंसेवी संघटना दिन साजरा करण्यामागचे उद्धिष्ट :

  • जगभरातील स्वयंसेवी संस्थांच्या कामगिरी आणि यशावर प्रकाश टाकणे.
  • समाजातील स्वयंसेवी संस्थांची भूमिका लोकांना समजावणे.
  • जगभरातील चांगल्या हेतूसाठी कार्य केलेल्या लोकांना प्रोत्साहित करणे.

Latest Posts

Don't Miss