Friday, December 1, 2023

Latest Posts

जगातील पहिला मोबाईल फोन कधी आणि कोणी वापरला होता? तुम्हाला माहित आहे का ?

आज प्रत्येक व्यक्ती मोबाईल फोनवर (Mobile) अवलंबून आहे. आजच्या आधुनिक युगात मोबाईलशिवाय जगणे शक्य नाही. शॅपिंग असो किंवा घरी जेवण ऑर्डर करणे असो, ऑनलाइन पेमेंट करणे असो, प्रत्येकजण यासाठी मोबाईलचा वापर करतो.

आज प्रत्येक व्यक्ती मोबाईल फोनवर (Mobile) अवलंबून आहे. आजच्या आधुनिक युगात मोबाईलशिवाय जगणे शक्य नाही. शॅपिंग असो किंवा घरी जेवण ऑर्डर करणे असो, ऑनलाइन पेमेंट करणे असो, प्रत्येकजण यासाठी मोबाईलचा वापर करतो. मोबाइल ही अशी वस्तू झाली आहे, जिच्याशिवाय आता कोणीच राहू शकत नाही. मोबाइलच्या गरजेचं रुपांतर व्यसनात कधी झालं हे आपल्याला कळलंच नाही. अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांसाठीच मोबाइल ही जीवनावश्यक वस्तू बनून गेली आहे. भारतीय बाजारपेठेत सध्या अॅपल, सॅमसंग, वनप्लस, सोनी, मायक्रोमॅक्स, रिअलमी, विवो, ओप्पो, नोकियासारख्या अनेक कंपन्या आहेत. भारतात मोबाईल वापरणाऱ्या ग्राहकांची संख्या एक अब्जाहून अधिक आहे. पण, तुम्हाला माहीत आहे का, जगातील पहिला मोबाइल कोणी बनवला आणि त्याची किंमत काय होती.

जगातला पहिला मोबईल फोन हा तब्बल २ किलो वजनाचा होता. या फोनला Motorola कंपनीने १९८४ साली तयार केलं होतं. Motorola च्या या फोनचं नाव Motorola’s DynaTAC 6000X असं होतं. या फोनमध्ये 14 डिजीटच्या एलईडी डिस्पलेसोबत प्रोग्रामिंगसाठी किपॅड आणि कॉल अलर्ट किंवा लाइट फिचर सुध्दा होता

पहिल्यांदा कोणी आणी कधी वापरला?

न्यूयॉर्कमध्ये राहाणाऱ्या मार्टिन कुपर (Martin Cooper) यांनी पहिला मोबाईल बनवला आणि त्यांनीच त्याच्या वापराला सुरुवात केली. त्यांनी पहिला कॅाल स्वत:च्या टिमला केला. हा फोन बनवण्यासाठी तेव्हा तब्बल ८ कोटींचा खर्च आला होता. पहिला मोबाईल फोन १९७३ साली बनवला. त्यानंतर १९८३ साली तो मार्केटमध्ये आला. म्हणजे पहिला मोबाईल फोन सामान्यांना उपलब्ध होण्यासाठी तब्बल १० वर्ष लागली. otorola DynaTAC 6000X या फोनची विक्री पहिल्यांदाच यूएस मार्केटमध्ये सुरू झाली. त्यावेळी या मोबाईलची किंमत ३,३९९ डॉलर म्हणजेच भारतीय रुपयांत २,४०,७१२ इतकी ठरविण्यात आली होती. तसेच मोटोररोला कंपनीचा हा मोबाईल फोन चार्ज करण्यासाठी तासांचा १० तासांचा वेळ लागायचेा विशेष इतका वेळ चार्जिंग करूनही मोबाईलची बॅटरी अवघी ३० मिनिट टिकायची.

हे ही वाचा : 

आता ‘iPhone’ ही होणार ‘मेड इन इंडिया’ (Made in India)

संजय राऊतांनी फडणवीसांनी डिवचलं, मी पुन्हा येईल चं आम्ही सध्या स्वागत करतो कारण…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .

Latest Posts

Don't Miss