हा देश तुमच्यामुळे सुरक्षित आहे, या देशाच्या सीमा तुमच्यामुळे भक्कम आहेत, जिथे राम असेल तिथे अयोध्या आहे आणि जिथे तुम्ही असाल त्याच ठिकाणी माझी दिवाळी असेल असं उद्गगार पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी काढलं. ते देशातील जवानांसोबत (Indian Army) दिवाळी साजरी करण्यासाठी हिमाचल प्रदेशातील लेपचा (Lepcha in Himachal Pradesh) येथे पोहोचले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जवानांना मिठाई खाऊ घालून दिवाळी साजरी केली.
यावेळी पंतप्रधान मोदींनी लष्कराच्या जवानांना सांगितले की, तुम्ही उत्साहाने आणि उर्जेने भरलेले आहात. 140 कोटी लोकांचा हा मोठा परिवार तुमचा आहे असे तुम्ही मानता. देश तुमचा ऋणी आहे. दिवाळीच्या काळात तुमच्या कल्याणासाठी दिवाही लावला जातो. जिथे राम आहे तिथे अयोध्या आहे. माझ्यासाठी आमचे सैन्य ज्या ठिकाणी तैनात आहे ते मंदिरापेक्षा कमी नाही. तुम्ही जिथे आहात त्याच ठिकाणी माझा सण.
पीएम नरेंद्र मोदी म्हणाले की, संकटाच्या वेळी आपले सैन्य देशातील लोकांना तसेच परदेशी लोकांना मदत करते आणि त्यांची सुटका करते, मग ते सुदान असो किंवा तुर्की. आज जगात ज्या प्रकारची परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे जगाच्या आपल्याकडून अपेक्षा वाढत आहेत. अशा परिस्थितीत देशाच्या सीमा सुरक्षित राहणे आणि देशात शांतता राखणे महत्त्वाचे आहे. माझे मित्र जोपर्यंत हिमालयासारख्या सीमेवर ठाम आहेत तोपर्यंत भारत सुरक्षित आहे. प्रत्येकाला कुटुंबाची आठवण येते, पण तुमच्या चेहऱ्यावर दुःख दिसत नाही. तुमच्यात उत्साह कमी असण्याचे लक्षण नाही.
पीएम मोदी म्हणाले की, आमच्या जवानांना नेहमीच या शूर वसुंधराचा वारसा आहे, त्यांच्या छातीत ती आग आहे ज्याने नेहमीच शौर्याचे उदाहरण निर्माण केले आहे. आपले सैनिक जीव धोक्यात घालून नेहमीच आघाडीवर राहिले आहेत. सीमेवरील देशाची सर्वात मजबूत भिंत असल्याचे आपल्या सैनिकांनी नेहमीच सिद्ध केले आहे.
जिथे राम तिथे अयोध्या, जिथे तुम्ही तिथे माझी दिवाळी – नरेंद्र मोदी
हा देश तुमच्यामुळे सुरक्षित आहे, या देशाच्या सीमा तुमच्यामुळे भक्कम आहेत, जिथे राम असेल तिथे अयोध्या आहे आणि जिथे तुम्ही असाल त्याच ठिकाणी माझी दिवाळी असेल असं उद्गगार पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी काढलं. ते देशातील जवानांसोबत (Indian Army) दिवाळी साजरी करण्यासाठी हिमाचल प्रदेशातील लेपचा (Lepcha in Himachal Pradesh) येथे पोहोचले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जवानांना मिठाई खाऊ घालून दिवाळी साजरी केली.
यावेळी पंतप्रधान मोदींनी लष्कराच्या जवानांना सांगितले की, तुम्ही उत्साहाने आणि उर्जेने भरलेले आहात. 140 कोटी लोकांचा हा मोठा परिवार तुमचा आहे असे तुम्ही मानता. देश तुमचा ऋणी आहे. दिवाळीच्या काळात तुमच्या कल्याणासाठी दिवाही लावला जातो. जिथे राम आहे तिथे अयोध्या आहे. माझ्यासाठी आमचे सैन्य ज्या ठिकाणी तैनात आहे ते मंदिरापेक्षा कमी नाही. तुम्ही जिथे आहात त्याच ठिकाणी माझा सण.
पीएम मोदी म्हणाले की, आमच्या जवानांना नेहमीच या शूर वसुंधराचा वारसा आहे, त्यांच्या छातीत ती आग आहे ज्याने नेहमीच शौर्याचे उदाहरण निर्माण केले आहे. आपले सैनिक जीव धोक्यात घालून नेहमीच आघाडीवर राहिले आहेत. सीमेवरील देशाची सर्वात मजबूत भिंत असल्याचे आपल्या सैनिकांनी नेहमीच सिद्ध केले आहे.
हे ही वाचा :
दिवाळीला कुणाचा पत्ता होणार कट?विकेंड का वारला सलमान ऐश्वर्यावर भडकला
दिवाळी पाडवा कधी आहे? शुभ मुहूर्त आणि महत्व घ्या जाणून
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.