पाकिस्तानात काल ट्रेन हायजॅक झाला होता. त्यानंतर बलुचिस्तानात बलोच आर्मीच्या सगळ्या जगभरात चर्चा आहे. बलॉचच्या ४० फायटर्सनी पाकिस्तानी सैन्याला गुडघे टेकल्याला भाग पडलं आहे. २००० साली स्थापन झालेल्या बलोच लिबरेशन आर्मीच्या प्रमुख बशीर जेब आहे. बीएलएमध्ये बशीर जेबच पद कमांडर इन चीफ म्हणेज सैन्य प्रमुखाच आहे. सन 2018 मध्ये बशीर जेबला बीएलएची कमान मिळाली. कमांडर इन चीफ बनण्याआधी बशीर जेब कोर कमिटीचा प्रमुख होता. जेब आल्यानंतर बलूचिस्तानात बीएलएच्या कारवायांची चर्चा सुरु झाली. बलूचिस्तानवरील सरकारच नियंत्रण संपत चाललय असं पाकिस्तानातील मोठे नेते बोलू लागले आहेत.
पाकिस्तानचे वरिष्ठ पत्रकार किया बलोच यांच्यानुसार जेबच वय 40 च्या आसपास आहे. जेब एका मध्यमवर्गीय कुटुंबातून येतो. बलूचिस्तानच्या स्वातंत्र्य लढण्यासाठी तो बीएलएमध्ये सहभागी झाला. आपल्या रणनितीच्या बळावर हळूहळू जेब बशीर बलोच लिबरेशन आर्मीच्या प्रमुख पदावर पोहोचला.
सीक्रेट ऑपरेशनमध्ये हत्या
पाकिस्तानी वर्तमानपत्र ट्रिब्यूननुसार, डिसेंबर 2018 साली एक सीक्रेट ऑपरेशनमध्ये पाकिस्तानी सैन्याने बलोच लिबरेशन आर्मीचा प्रमुख असलम बलोचची काबुलमध्ये हत्या केली. त्यानंतर बीएलएची कमान जेब बशीरकडे सोपवण्यात आली. जेब बशीरचे वडिल बलूचिस्तानातील प्रसिद्ध डॉक्टर आहेत. जेबच घर बलूचिस्तानची प्रांतीय राजधानी क्वेटापासून 145 किलोमीटर पूर्वेला नुश्की गावात आहे. जेब मुहम्मद हसनी जनजातीशी संबंधित आहे. मुहम्मद हसनी ही दक्षिणी बलूचिस्तानच्या अनेक जिल्ह्यांमध्ये पसरलेली एक मोठी जनजाती आहे.
जेबकडे इंजीनियरिंगची डिग्री आहे
जेबकडे इंजीनियरिंगची डिग्री आहे. जेबने आपलं सुरुवातीच शिक्षण क्वेटाच्या डिग्री कॉलेजमधून पूर्ण केलं. जेब 2012 साली बीएलएच्या आजाद मिशनमध्ये सहभागी झाला, तेव्हापासून तो या संघटनेमध्ये आहे.
घात लावून हल्ला करण्याच प्रमाण वाढवलं
किया बलोचनुसार, जेब बशीर संघटनेत आल्यामुळे BLA खूप मजबूत संघटना झालीय. जेबने घात लावून हल्ला करण्याच प्रमाण वाढवलं. त्याच्या नेतृत्वात BLA ने सोशल मीडियाचा वापर वाढवला. अलीकडे याच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन बीएलएचे बंडखोर चीन-पाकिस्तानला आव्हान देत असतात.
तालिबानसोबत सुद्धा चांगले संबंध
प्रमुख बनल्यावर जेबने आत्मघातकी हल्लेखोर तयार केले. बलूच भागात यासाठी त्याने महिलांना पुढे केलं. बलूचच्या सुसाइट बॉम्बर महिला बुर्ख्यामध्ये जॅकेट घालून बॉम्ब ठेवतात. जेबच्या नेतृत्वाखाली बीएलएने पाकिस्तान सोबतच चिनी सैनिकांची सुद्धा हत्या केली. त्यांचे तालिबानसोबत सुद्धा चांगले संबंध आहेत. त्यामुळे पाकिस्तानी सैन्याला या भागात असहाय्य वाटतं.
पाकिस्तान सैन्यापेक्षा जास्त शिकलेले लोक
जेबने बलोच लिबरेशन आर्मीशी नव्या लोकांना जोडलं. पाकिस्तान सैन्यापेक्षा जास्त शिकलेले लोक बीएलएमध्ये आहेत. त्यामुळे बलूचिस्तानात बीएलए पाकिस्तानी सैन्याला मात देत आहे.