वीर बाल दिवस २६ डिसेंबर रोजी साजरा केला जातो. हा दिवस विशेषतः गुरु गोविंद सिंह यांना समर्पित केला जातो, पण यांच्या २ मुलांच्या बलिदानाची आठवण म्हणून हा दिवस वीर बाल दिवस म्हणून साजरा केला जातो. २६ डिसेंबर १७०५ रोजी मुगल साम्राज्याने बंदी केले होते. या दिवसाला भारतीय सरकारने 2022 मध्ये अधिकृतपणे वीर बाल दिवस म्हणून घोषित केले.
गुरु गोबिंद सिंग हे सिख धर्माचे दहावे गुरु होते. त्यांनी धर्माचे रक्षण करत आपल्या प्राणाची हसत हसत आहुती दिली. पण त्यांच्या २ मुलांच्या शहादतीबद्दल लोकांना खूप कमी माहिती आहे. २६ डिसेंबरला गुरु गोविंदसिंह यांच्या मुलांच्या शहादतीचे स्मरण करून वीर बाल दिवस साजरा केला जातो. गुरु गोबिंद सिंग यांच्या मुलांनी आपला धर्म आणि धर्मनिरपेक्षतेसाठी जे बलिदान दिले ते अनमोल आहे. पंतप्रधान नरेंद मोदी यांनी या दिवसाची घोषणा २०२२ मध्ये केली. जाणून घ्या कोण होते गुरु गोविंदसिंहजींचे मुले, ज्यांच्या स्मरणार्थ वीर बाल दिवस साजरा करतो…
१७०५ सालाची ही गोष्ट आहे. गुरु गोविंद सिंह आपल्या मुलांसोबत झोपले असताना त्यावेळी मुघलांनी गुरु गोविंद सिंह यानं पकडण्याचा फतवा जाहीर केला. गुरु गोविंद सिंह आपल्या कुटुंबापासून वेगळे झाले होते. गुरु गोविंद सिंह यांना अत्यंत क्रूरपणे शिक्षा दिली गेली. ते आपल्या मतांशी ठाम होते. धर्माच्या रक्षणासाठी आपले प्राण अर्पण केले.
गोविंद यांच्या पत्नी माता गुजरी आपल्या मुलांना बाबा जोरावर सिंह आणि बाबा फतेह सिंह यांच्यासोबत स्वयंपाकी गंगूसोबत गुप्त ठिकाणी गेल्या. पण लोभाच्या कारणास्तव गंगूने सरहिंदचे नवाब वजीर खान यांच्या हाती त्या सर्वांना पकडून दिले. नवाब वजीर खान गुरु गोविंद सिंह कुटुंबियांसोबत खूप अत्याचार केले. त्यांना धर्म बदलण्यास सांगितले. यावेळी गुरु गोविंद सिंह यांच्या दोन लहान मुलांनी, साहिबजादा जोरावर सिंग (वय 9 वर्ष) आणि साहिबजादा फतेह सिंग (वय 7 वर्ष), आपल्या जीवनाची आहुती दिली. गुरु गोबिंद सिंग यांच्या मुलांनी आपला धर्म आणि धर्मनिरपेक्षतेसाठी जे बलिदान दिले ते अनमोल आहे.
वीर बाल दिवस हे त्यांचे साहस, धैर्य आणि बलिदान यांना मान्यता देण्यासाठी साजरे केले जाते. या दिवशी सिख समुदाय आणि सर्व भारतीय त्यांच्या शौर्याची आणि साहसाची श्रद्धांजली अर्पित करतात.
हे ही वाचा:
Eknath Shinde Live: विधानसभेत मिळालेला विजय ऐतिहासिक, मी कॉमन मॅन म्हणून….काय म्हणाले एकनाथ शिंदे?
लोकसभेच्या निवडणूकीतून आम्ही जे शिकलो तसं महाविकास आघाडीने शिकलं पाहीजे: Chandrashekhar Bawankule