Thursday, April 18, 2024

Latest Posts

Brijbhushan Singh यांना अटक होणार का? २ कुस्तीपटू, १ रेफरी, १ कोच यांनी दिला विरोधात जबाब

ब्रिजभूषण सिंह यांच्यावर कुस्तीपटूंनी लावलेल्या आरोपांवर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी अशी मागणी अनेकांनी केली आहे आणि कुस्तीपटूंच्या या जंतरमंतर आंदोलनाला बऱ्याच जणांचा पाठिंबा मिळत आहे.

ब्रिजभूषण सिंह यांच्यावर कुस्तीपटूंनी लावलेल्या आरोपांवर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी अशी मागणी अनेकांनी केली आहे आणि कुस्तीपटूंच्या या जंतरमंतर आंदोलनाला बऱ्याच जणांचा पाठिंबा मिळत आहे. ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर एक ऑलिम्पियन, एक राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेता कुस्तीपटू, एक आंतरराष्ट्रीय रेफरी आणि राज्यस्तरीय कोच कुस्तीपटूंच्या आरोपांना पुष्टी दिली आहे. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणातील चार राज्यांमधील १२५ साक्षीदारांचे जबाब नोंदवले आहेत. २८ एप्रिल रोजी दिल्ली पोलिसांनी २ एफआयआर नोंदवल्या आहेत त्यामध्ये लैंगिक अत्याचाराच्या १५ घटना आहेत तर अयोग्य ठिकाणी स्पर्शाची १० प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत.

जेव्हा दिल्ली पोलिसांच्या प्रवक्त्या सुमन नलवा याना चार साक्षीदारांबद्दल विचारले असता त्यांनी सांगितले की, आम्ही या प्रकरणामध्ये तपास किंवा पुराव्यावर भाष्य कर शकत नाही. अजूनही तपास सुरु आहे. एसआयटी या प्रकाराची चौकशी करत आहेत न्यायालयामध्ये अहवाल सादर केला जाणार आहे. एक प्रशिक्षकाने सांगितले की, कुस्तीपटूने ब्रिजभूषण यांना घटनेच्या ६ तासानंतरच फोनवरून माहिती देण्यात आली. ब्रिजभूषण यांच्यावर केलेल्या तक्रारदाराने लैंगिक छळाच्या घटनांची माहिती एका महिन्यांनंतरच देण्यात आली आहे. रेफ्री हे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सर्किटमध्ये मोठे नाव समजले जाते आणि दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहिती बद्दल असे सांगण्यात आले की जेव्हा ते स्पर्धांमध्ये देश-परदेशामध्ये जात होते तेव्हा त्यांना महिला कुस्तीपटूंची ही अवस्था मला कळायची असे तो म्हणाला.

एसआयटीने १५८ लोकांची यादी तयार केली आहे. एसआयटीने पुरावे गोळा करण्यासाठी हरियाणा, उत्तर प्रदेश, झारखंड आणि कर्नाटकला भेटी दिल्या आहेत आणि आतापर्यत त्यांनी १२५ जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. त्याचबरोबर चार महिलांनी त्यांच्या आरोपात कुस्तीपटूंच्या आरोपांना पुष्टी दिली आहे. आतापर्यत एका अल्पवयीन तक्रारदाराने त्यांच्या तक्रारींमध्ये केलेल्या आरोपांची पुष्टी करून कलम १६४ अंतर्गत दंडाधिकार्‍यांसमोर त्यांचे जबाब नोंदवले आहेत.

हे ही वाचा:

Vat Pournima 2023: वटपौर्णिमेनिमित्त अशा पद्धतीने सजवा पूजेचे ताट

बीडमधून केली एका शेतकरी मुलाने गौतमीला लग्नाची मागणी

CSK vs GT, नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा धोनीचा निर्णय

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss