Saturday, June 3, 2023

Latest Posts

Mothers Day निम्मित तुमच्या आईवर करा खास शुभेच्छांचा वर्षाव…

मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी संपूर्ण जगभरात मदर्स डे म्हणजेच मातृदिन साजरा केला जातो. मदर्स डे म्हणजेच आईचा दिवस. यावर्षी मदर्स डे हा १४ मे रोजी साजरा केला जाणार आहे. मदर्स डे ची सुरुवात अमेरिकेत झाली असून मागील काही वर्षांपासून हा दिवस भारतात देखील मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी संपूर्ण जगभरात मदर्स डे म्हणजेच मातृदिन साजरा केला जातो. मदर्स डे म्हणजेच आईचा दिवस. यावर्षी मदर्स डे हा १४ मे रोजी साजरा केला जाणार आहे. मदर्स डे ची सुरुवात अमेरिकेत झाली असून मागील काही वर्षांपासून हा दिवस भारतात देखील मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मदर्स डे अर्थात मातृदिन हा आईचा दिवस. या दिवशी आपण आई बद्दलचे प्रेम व्यक्त करतो. पण आई बद्दलचे प्रेम व्यक्त करण्यासाठी हा एक दिवस काही पुरेसा नाही. आई हि आपल्याला देवासारखीच, आई हि आपली पहिली गुरु असते. आई हि अगदी तिच्या पोटात मूल असल्यापासून ते मोठे होईपर्यंत त्याचा सांभाळ करते. ती आपल्या मुलांसाठी अनेक वेदना सोसते. स्वतःची आवड न जोपासता ती नेहमी तिच्या मुलांचा विचार करत असते. अगदी कोणत्याही संकटात सापडलेल्या मुलांसाठी आई ही धावून येते. आई आपल्याला अनेक गोष्टी शिकवते आपणही आईकडून अनेक गोष्टी शिकतो. मदर्स डे च्या निमित्ताने आपल्याला आई बद्दलचे प्रेम, माया, जिव्हाळा व्यक्त करण्याची संधी मिळते. आई हि खूपच थोर व्यक्ती आहे. ती तिच्या मुलांसाठी अनेक गोष्टींचा त्याग करत मुलांचा सांभाळ करते त्यांना शिकवून चांगला मोठं करते. सध्याच्या बिझी आयुष्यात आपल्याला आईला वेळ देता येत नाही किंवा तिच्यासाठी काही खास गोष्टी करता येत नाही. आईचे तिच्या मुलांवर अतिशय जीवापाड प्रेम असते. आई चे प्रेम आईची माया आईचे महत्व सांगायला खरतर शब्दच अपुरे पडतात. तर अश्या आपल्या प्रेमळ आईला द्या या शुभेच्छा…

आई माझा गुरु, आई माझे कल्पतरू, आईचेप्रेम आकाशाहूनही मोठे आणि सागराहूनही खोल आहे – मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

आई म्हणजे मंदिराचा उंच कळस, आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस, आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संतवाणी, आई म्हणजे वाळवंटात प्यावे असे थंड पाणी… मातृदिनाच्या शुभेच्छा

तुझ्यामुळे जन्म माझा, पहिले हे जग मी
कसे हे फेड ऋण तुझे, असंख्य जन्माचा कृतज्ञ मी
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

आई आहे म्हणून सारे विश्व आहे, म्हणूनच मी आहे
आई आहे म्हणूच हे सुंदर नाती आहेत
आई तुला मातृदिनाच्या बार्बारून शुभेच्छा !

माझ्या हृदयात एकाच व्यक्तीला अढळ स्थान आहे
आणि ती म्हणजे तू आहेस आई- Happy Mothers Day

देवा सुखी ठेव तिला ,
जिने जन्म दिलाय मला ,
आई तुला मातृदिनाच्या मनापासून शुभेच्छा!

हे ही वाचा : 

पौष्टिक, चवदार अळूच्या पातवड्या

Mother’s day निमित्त आईसाठी बनवा ‘हा’ खास केक

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो कर.

Latest Posts

Don't Miss