Woman Health : महिलांनी वयाची तिशी ओलांडली की अनेक स्त्रियांना टेन्शन येत, कारण वयाच्या तिशीनंतर शरीरामध्ये आणि मानसिकदृष्ट्या अनेक बदल घडू लागतात. आत्मविश्वासाने जगासमोर खंबीरपणे उभे राहिले पाहिजे, आणि यासाठी महिलांनी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या मजबूत असणेही महत्त्वाचे आहे. वयाच्या २८ ते ३० वर्षानंतर महिलांनी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त राहण्यासाठी त्यांच्या जीवनशैलीत काही बदल करणे आवश्यक आहे. या टप्प्यापर्यंत प्रत्येकाने आपल्या व्यक्तिमत्त्वात काही बदल करायला हवेत. आपण जीवनशैली आणि खाण्याच्या सवयींवर देखील लक्ष देणे सुरू केले पाहिजे.
30 नंतर शरीरात अनेक बदल होतात, विशेषतः महिलांना या काळात अनेक हार्मोनल बदलांना सामोरे जावे लागते. अनेकदा काम आणि इतर जबाबदाऱ्यांमुळे महिला त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात, त्यामुळे त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. जेव्हा महिलांचे वय तिशी ओलांडते तेव्हा शरीरात पोषक तत्वांच्या कमतरतेची लक्षणे दिसू लागतात. त्यामुळे ‘या’ टिप्स फॉलो करा.
Woman Health spacial tips :
संतुलित आहार :
महिलांसाठी संतुलित आहार अत्यंत महत्वाचा आहे. प्रथिनं, जीवनसत्त्वं, खनिजे, फायबर्स आणि आवश्यक चरबी यांचा योग्य प्रमाणात समावेश करा.
फळं, भाज्या, कडधान्ये, ताजे दूध आणि दूधजन्य पदार्थ, अंडी आणि पूर्ण धान्यांचा आहारात समावेश करा.
जास्त तेलकट, जड आणि मसालेदार पदार्थांपासून दूर राहा.
व्यायाम:
दररोज काही वेळ व्यायाम करा. कार्डिओ व्यायाम (चालणे, धावणे, सायकलिंग) आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग (वजन उचलणे, योग) यांचा समावेश करा.
योग आणि प्राणायाम महिलांच्या मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यासाठी फायदेशीर ठरते.
मानसिक तणाव कमी करा:
तणाव कमी करण्यासाठी ध्यान, श्वासोच्छ्वास तंत्र किंवा हलका योगा करा.
वेळोवेळी आराम घ्या आणि स्वतःसाठी काही वेळ काढा. या बाबी मानसिक संतुलन राखण्यासाठी महत्वाच्या असतात.
स्मोकिंग आणि अल्कोहोल पासून दूर राहा:
स्मोकिंग आणि अत्यधिक मद्यपान महिलांच्या आरोग्यासाठी हानिकारक असतात. यामुळे हृदयरोग, कर्करोग, हाडांची हानी व इतर अनेक समस्या उद्भवू शकतात.
काळजी घ्या आणि स्वतःसाठी वेळ काढा:
घर, काम आणि कुटुंबाच्या जबाबदाऱ्यांमध्ये स्वतःसाठी वेळ काढणे महत्वाचे आहे. स्वतःची काळजी घ्या आणि मानसिक ताजेपणासाठी कधीतरी ब्रेक घ्या.
हॉर्मोनल बदलांवर लक्ष ठेवा:
30 च्या दशकाच्या आसपास महिलांच्या शरीरात हॉर्मोनल बदल होतात. यामुळे काही वेळा मानसिक आणि शारीरिक बदल होऊ शकतात. यावर लक्ष ठेवून वयाच्या अनुसार जीवनशैलीत बदल करा.
हे ही वाचा:
Raj Thackeray: मराठी भाषा गौरव दिनानिमित्त पुस्तक प्रदर्शन
Follow Us