spot_img
Saturday, March 22, 2025

Latest Posts

Women’s Day 2025 : महिलेच्या सन्मानासाठी साजरा करणाऱ्या ‘जागतिक महिला दिवसामागील नेमके कारण काय?

Women’s Day 2025 : महिला दिन हा एक महत्त्वपूर्ण जागतिक दिन आहे, जो प्रत्येक वर्षी ८ मार्चला साजरा केला जातो. हा दिवस महिलांच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रातील योगदानाला मान्यता देण्यासाठी आणि महिलांच्या अधिकारांसाठी संघर्ष करण्याच्या उद्देशाने साजरा केला जातो. महिला कोणत्याही बाबतीत मागे नाहीत. त्यांनी प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. प्रत्येक ठिकाणी महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून उभ्या आहेत. समाजाच्या प्रगतीत पुरुषांइतकाच महिलांचाही वाटा आहे, पण तरीही अनेक ठिकाणी महिलांना पुरुषांइतकीच संधी आणि सन्मान मिळत नाही.

८ मार्चला संपूर्ण ‘जगभरात महिला दिन’ (International Women’s Day २०२५) साजरा केला जाणार आहे. महिलांच्या सन्मानार्थ जगभरात मोठ्या उत्साहात जागतिक महिला दिन साजरा केला जातो. ठिकठिकाणी, ऑफिसेसमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. पण तुम्हाला या दिवसाचं महत्त्व माहितीय का?

जागतिक महिला दिनाची संकल्पना
आंतरराष्ट्रीय महिला दिन ही खरं तर कामगार चळवळीची निर्मिती आहे. महिला दिनाचा इतिहास १९०८ सालापासून साजरा होत आहे, यामागचे कारण म्हणजे जेव्हा न्यूयॉर्क शहरात १५,००० महिलंनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले होते, त्यांच्या मागण्या अशा होत्या की कामाचे तास कमी करावेत, चांगले वेतन मिळणे आणि मताधिकार हक्कांसाठी लढा देत होत्या. त्यानंतर, १९१० मध्ये कोपनहेगनमध्ये झालेल्या दुसऱ्या इंटरनॅशनल सोशलिस्ट वुमेन्स कॉन्फरन्समध्ये क्लारा झेटकिन यांनी या दिवसाची संकल्पना मांडली, ज्याला त्यानंतर “आंतरराष्ट्रीय महिला दिन” म्हणून साजरा करण्यात आला.

महिला दिनाचे महत्त्व:
हा दिवस महिलांना त्यांच्या हक्कांची आणि संधींची जाणीव करून देतो. महिलांना सक्षम बनविणे, त्यांचा आवाज उचलणे आणि समानतेसाठी लढा देणे हे या दिवसाचे मुख्य उद्दीष्ट आहे. या दिवशी महिलांच्या समस्या आणि आव्हानांना समोर आणले जाते, जसे की लैंगिक समानता, शिक्षण, आरोग्य, आणि कामकाजी अधिकार. महिलांना त्यांच्या समान अधिकारांसाठी जागरूक करणे, त्यांच्या हक्कांची रक्षा करणे आणि कार्यक्षेत्रातील समानतेसाठी प्रयत्न करणे.

कश्यापद्धतीने हा दिवस साजरा केला जातो?
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर महिलांविषयी पोस्ट्स, कथा, आणि व्हिडिओ शेअर करून महिलांच्या संघर्षांबद्दल जागरूकता वाढविली जाते. महिला दिनानिमित्त शाळा आणि महाविद्यालयांमध्ये विशेष कार्यक्रम, सेमिनार, वर्कशॉप्स आयोजित केल्या जातात. महिलांच्या सक्षमीकरणासाठी अनेक संस्था आणि संघटनांकडून महिलांसाठी कार्यशाळा, समुपदेशन, शिक्षण, आणि आरोग्य सेवांची व्यवस्था केली जाते.

हे ही वाचा : 

Bank Holidays in April 2023, एप्रिल महिन्यात बँका तब्बल १५ दिवस बंद, जाणून घ्या सुट्ट्याची यादी

Chaitra Navratri Sabudana Kheer Recipe, उपवास आहे? तर घरच्या घरी बनवा साबुदाणा खीर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss