Women’s Day Wishes 2025 : दरवर्षी ८ मार्च जागतिक महिला दिन (International Womens Day) म्हणून साजरा केला जातो. ज्याचा उद्देश महिलांचे हक्क, समानता आणि सक्षमीकरणाला प्रोत्साहन देणे आहे. हा दिवस महिलांच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रातील योगदानाला मान्यता देण्यासाठी आणि महिलांच्या अधिकारांसाठी संघर्ष करण्याच्या उद्देशाने साजरा केला जातो. महिला दिन हा एक महत्त्वपूर्ण जागतिक दिन म्हणून देखील साजरा केला जातो. या दिनाच्यानिमित्ताने तुम्ही तुमच्या आयुष्यातील काही खास महिलांना हे शुभेच्छा पाठवू शकता.
जागतिक महिला दिनानिमित्त खास शुभेच्छा :
- मी न अबला मी न सबला मी तर आहे प्रबला
नव्या युगाची नवी झेप ही हा तर स्त्री सन्मानाचा सोहळा।।
जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा - श्री म्हणजे अडवळयांवर मात,
स्त्री म्हणजे क्षणा क्षणांची साथ,
तुझ्या कर्तृत्त्वाला सर्वांचा सलाम.
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा ! - आदिशक्ती तू,
प्रभूची भक्ती तू,
झाशीची राणी,
मावळ्यांची भवानी तू,
प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू
आजच्या युगाची प्रगती तू…
” तुला मानाचा मुजरा
महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! - आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर
आपली भूमि भूमिका योग्य
पद्धतीने साकारणाऱ्या,
आई, बहीण, पत्नी, लेकीस
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा ! - आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर
आपली योग्य भूमिका बजावून
वृत्तस्वीपणे आपले कर्तृत्व जगाला
वाखवून देणाऱ्या आई, बहिण, पत्नी, मुलगी आणि मैत्रीण
अशा विविध रूपात पुरुषांच्या मागे
खंबीर पणे उभ्या राहणाऱ्या समस्त स्त्री वर्गाला
जागतिक महिला दिनाच्या अनेक अनेक शुभेच्छा आणि मानाचा मुजरा.. - एक यावा असा दिन,
ना राहो महिला ‘दीन’
आणि रोजच असावा
‘जागतिक महिला दिन’
आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!हे ही वाचा :
Navneet Rana : औरंगजेबाबद्दल ज्यांना प्रेम आहे त्यांनी आपल्या घरात त्याची कबर लावून घ्या- नवनीत राणा
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.