भारतातील जी- २० परिषदेच्या मोठ्या बैठकीचा आज पहिला दिवस आहे. दिल्लीमध्ये आज आणि उद्या ही बैठक पार पडणार आहे. यासाठी कित्येक देशांचे अध्यक्ष, राष्ट्रपती आणि पंतप्रधान भारतात दाखल झाले आहेत. या बैठकीची सुरुवात पंतप्रधान मोदींच्या भाषणाने झाली. जी-20 शिखर परिषदेत सहभागी झालेल्या पाहुण्यांनी रविवारी सकाळी राजघाटावर जाऊन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली. तत्पूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्यासह सर्व जी-20 नेत्यांचे राजघाटावर स्वागत केले.शाल प्रदान करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांचे स्वागत केले. यावेळी स्वागत स्थळाच्या पार्श्वभूमीवर बापूंच्या साबरमती आश्रमाचे मोठे पोस्टर लावण्यात आले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साबरमती आश्रमाच्या बापू कुटीबाबत सर्व देशांचे राष्ट्राध्यक्ष, निमंत्रित देशांचे नेते आणि आंतरराष्ट्रीय संस्थांच्या प्रमुखांना माहिती दिली. ‘बापू कुटी’ हे महात्मा गांधींचे १९३६ ते १९४८ मध्ये मृत्यू होईपर्यंत निवासस्थान होते.यूएनचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आयएमएफ) प्रमुख क्रिस्टालिना जॉर्जिएवा, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना आणि सिंगापूरचे पंतप्रधान ली सिएन लूंग हे राजघाटावर पोहोचणाऱ्या पहिल्या नेत्यांमध्ये होते. यानंतर जी- २०सदस्य देशांचे राष्ट्रप्रमुख आले.
रविवारी सकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे राजघाटावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्यासह काही नेते अनवाणी चालले. तर काही नेत्यांनी पांढरे शूज घातलेले दिसले.मोदींनी ट्विटरवरील म्हटले की, जी- २० कुटुंबाने प्रतिष्ठित राजघाटावर शांतता, सेवा, करुणा आणि अहिंसेचे प्रतीक असलेल्या गांधींना श्रद्धांजली वाहिली. विविध राष्ट्रे एकत्र येत आले आहेत. गांधीजींचे सामंजस्यपूर्ण शाश्वत आदर्श, सर्वसमावेशक विचार समृद्ध जागतिक भविष्यासाठी आम्हाला मार्गदर्शन करतात, असही मोदींनी म्हटलं.
हे ही वाचा:
उद्धव ठाकरेंच्या हस्ते जळगावमध्ये दोन्ही महापुरुषांच्या पुतळ्याचे अनावरण
G20 summit, आज जी २० परिषदेचा दुसरा दिवस, सर्व राष्ट्रप्रमुख राजघाटावर…