भारतीय क्रिकेट संघ चौथ्यावेळी वनडे वर्ल्डकपच्या फायनल सामन्यात पोहचला आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये टीम इंडियाचा सामना ५ वेळा विश्वविजेत्या ठरलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरु आहे. टीम इंडियाने २०११ मध्ये एम.एस. धोनीच्या नेतृत्वाखाली दुसऱ्या वेळी वनडे वर्ल्ड कप जिंकला होता. टीम इंडियाने फायनलमध्ये मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर श्रीलंकेला हरवलं होतं. त्यानंतर वर्ल्ड कपच्या ट्रॉफीवरुन वाद निर्माण झाला होता. पुढे आयसीलीला यावर स्पष्टीकरण द्यावे लागले होते. फायनल मॅच जिंकल्यानंतर एम. एस. धोनीला जी ट्रॉफी दिली, त्यावरुन हा वाद झाला होता. एम. एस. धोनीला जी ट्रॉफी दिली गेली, ती ओरिजनल ट्रॉफी नाही असं अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आले होते. नकली ट्रॉफी असल्याची चर्चा सुरु झाल्याने मोठा वाद निर्माण झाला होता.
मुंबईच्या कस्टम विभागाकडे ओरिजनल ट्रॉफी असल्याचे मीडिया रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आले होते. पेमेंटमध्ये काही अडचणी असल्याने ट्रॉफी दिली नाही, असा दावा रिपोर्ट्समध्ये करण्यात आला होता. मीडियामध्ये ही बातमी आल्यानंतर अनेक फॅन्ससह काही माजी क्रिकेटपटू नाराज झाले होते. त्यानंतर आयसीसीने यावर स्पष्टीकरण दिलं होतं. आयसीसीने मीडिया रिपोर्ट्समध्ये आलेली बातमी चुकीची असल्याच म्हटले होते. टीम इंडियाचा कॅप्टन असलेल्या धोनीला वर्ल्ड कप जिंकल्यानंतर जी ट्रॉफी दिली गेली, ती ओरिजनल ट्रॉफी आहे. क्रिकेट वर्ल्ड कप २०११ साठी बनवलेली ट्रॉफीच धोनीला दिली गेली, त्यावर इवेंटचा लोगो सुद्धा आहे, असं स्पष्टीकरण आयसीसीने दिले होते.
आयसीसीच्या मुख्यालयात ठेवली जाणारी ट्रॉफी कस्टम विभागाकडे आहे, अशी माहिती आयसीसीने दिली होती. फक्त प्रमोशनल इवेंट्ससाठी ती ट्रॉफी आणली जाते, असं आयसीसीने म्हटलं होतं. या ट्रॉफीवर आयसीसीचा कॉर्पोरेट लोगो तसेच २०११ टुर्नामेंटचा लोगो नाही, असं त्यावेळी सांगण्यात आले होते. ही ट्रॉफी पुन्हा दुबईतील आयसीसीच्या मुख्यालयात नेली जाईल, असं आयसीसीने सांगितले होते. प्रत्येक वर्ल्ड कपसाठी नवीन ट्रॉफी बनवली जाते, हे आयसीसीने स्पष्ट सांगितल्यामुळे ओरिजनल ट्रॉफी नेहमीच आयसीसीच्या मुख्यालयात असते ही बाब स्पष्ट झाली.
हे ही वाचा :
क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामन्यावर बोलताना संजय राऊतांची टोलेबाजी
IND vs AUS WC Final 2023 टीम इंडियाचं शतक, विराट, राहुलकडे मोठी जबाबदारी