Wednesday, April 24, 2024

Latest Posts

दिल्लीच्या जंतरमंतरवर कुस्तीपटू आणि पोलिसांमध्ये झाला राडा

देशाच्या नव्या संसद भवनाचे उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला . या कार्यक्रमास देशातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली. तर गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या कुस्तीपटूंच्या आंदोलनासंबंधी दिल्ली येथे उपोषण आणि नारेबाजी मोठ्या प्रमाणात सुरु होत्या,

देशाच्या नव्या संसद भवनाचे उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला . या कार्यक्रमास देशातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली. तर गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या कुस्तीपटूंच्या आंदोलनासंबंधी दिल्ली येथे उपोषण आणि नारेबाजी मोठ्या प्रमाणात सुरु होत्या, मात्र या त्यांच्या आंदोलनाकडे लक्ष केंद्रित न करता नवीन संसद भवनांच्या उदघाटनाकडे जास्त लक्ष केंद्रित केले गेले आहे. तर दुसरीकडे नवीन संसद भवनाच्या समोर आंदोलनासाठी निघालेल्या कुस्तीपटूंना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. यावेळी पोलीस- कुस्तीपटूंमध्ये राडा झाल्याचे देखील पाहायला मिळालं. यानंतर क्रिडाप्रेमी आणि राजकीय नेत्यांकडून खेळाडूंना मिळत असलेल्या वागणूकीवरून टीका केली जात आहे.

महिनाभरापासून कुस्तीपटूंचे आंदोलन सुरु आहे. २३ मे रोजी दिल्लीत इंडिया गेटवर कँडल मार्च काढल्यानंतर आता महिला पंचायतच्या तयारीला वेग आलाय. यामध्ये सामील होण्यासाठी पैलवानांनी लोकांना आवाहन केलं आहे. तर भारतीय कुस्ती महासंघाचे प्रमुख आणि भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) यांच्या अटकेच्या मागणीवर कुस्तीपटू ठाम आहेत. आणि कुस्तीपटूंनी त्यांच्याया मॅग्निकड्डे प्रकर्षाने लक्ष दिले पाहिज आणि दुजोरा दिला पाहिजे असे देखील त्यांचे मत आहे. खेळाडूंना मात्र वाईट वागणूक दिली जात असल्याबद्दल सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात आहे. यानंतर क्रिडाप्रेमी आणि राजकीय नेत्यांकडून खेळाडूंना मिळत असलेल्या वागणूकीवरून टीका केली जात आहे.

तसेच पोलिसांनी कुस्तीपटूंना नवीन संसद भवनाकडे जाताना रोखल्यानंतर खेळाडू आणि पोलिसांत झालेल्या झटापटीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. नव्या संसद भवनाबाहेर आंदोलन करणार असल्याची माहिती कुस्तीपटू साक्षी मलिकने दिली आहे. दिल्लीमध्ये सुरु असलेल्या कुस्तीपटूंच्या आंदोलनात गोंधळ सुरु आहे. पोलिसांनी आता आंदोलक कुस्तीपटूंना ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे. त्यानंतर पोलीस आणि कुस्तीपटूनमध्ये बाचाबाची जळाई आणि त्यानंतर त्याचे रूपांतर मारामारी पर्यंत गेले. या इमारतीसमोरच भारतीय महिला कुस्तीपटू आंदोलन करणार होत्या. मात्र त्यापूर्वीच कुस्तीपटू आणि त्यांच्या समर्थकांना दिल्ली पोलिसांनी अटक केली. कुस्तीपटू साक्षी मलिकने या घटनेचा व्हिडीओ शेअर केला आहे.

हे ही वाचा:

नागपूर, पुण्यापाठोपाठ आता Saptshrungi Devi च्या दर्शनासाठी ड्रेस कोड?

२०२४ च्या निवडणुकीच्या संदर्भात ठाकरे गटाच्या नेत्यांचा मोठा दावा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss