Thursday, April 25, 2024

Latest Posts

स्टार प्रवाहवर रिलीज होणार ५५ वर्ष जुना चित्रपट

जी मज्जा जुन्या चित्रपट पाहायला येते तीच मज्जा नवे चित्रपट पाहायला कुठे? अनेक प्रेक्षकांना जुने चित्रपट पाहायला प्रचंड आवडते.

जी मज्जा जुन्या चित्रपट पाहायला येते तीच मज्जा नवे चित्रपट पाहायला कुठे? अनेक प्रेक्षकांना जुने चित्रपट पाहायला प्रचंड आवडते. काही जुने चित्रपट लोक अजूनही त्याच आवडीने पाहतात. आता ५५ वर्षांपूर्वी रिलीज झालेला आम्ही जातो आमुच्या गावा (Aamhi Jato Amuchya Gava) हा चित्रपट प्रेक्षकांना घरबसल्या पाहता येणार आहे.

दर्जेदार चित्रपट सादर करून प्रवाह पिक्चर वाहिनीने कमी वेळेतच प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. पावनखिंड, झिम्मा, चंद्रमुखी, दगडी चाळ २, बळी, कारखानिसांची वारी असे अनेक नवे चित्रपट पाहायला मिळाले. ५५ वर्षांपूर्वीचा एक चित्रपट आता स्टार प्रवाहवर पाहायला मिळणार आहे. ५५ वर्षांपूर्वीचा आम्ही जातो आमुच्या गावा हा चित्रपट प्रेक्षकांना घरबसल्या पाहता येणार आहे.

मराठी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळामधील हा सिनेमा प्रेक्षकांना घरबसल्या पाहायला मिळणार आहे. येत्या गुरुवारी म्हणजेच १८ मे रोजी दुपारी १ वाजता हा चित्रपट प्रवाह पिक्चरवर प्रेक्षकांना पहाता येणार आहे. १९६७ साली रिलीज झालेल्या आम्ही जातो आमच्या गावा या चित्रपटाला उदंड यश मिळाले. आम्ही जातो आमुच्या गावा या चित्रपटाला ५५ वर्ष पूर्ण झाले. उमा भेंडे, मधू आपटे आणि श्रीकांत मोघे या कलाकारांनी ‘आम्ही जातो आमुच्या गावा ’ या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकरली आहे.

हे ही वाचा : 

गौरी खानचं नवीन पुस्तक आलं वाचकांच्या भेटीस …. नवरा शाहरुख खानने केलं लाँच

प्रशांत दामले अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी विराजमान

Khupte Tithe Gupte च्या पहिल्या भागात कोण येणार पाहिलं? EKNATH SHINDE की RAJ THACKERAY?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss