मुंबई येथील मालाड या ठिकाणी एक अजब घटना घडल्याचे समोर आले आहे. चोरीच्या उद्देशाने आलेल्या चोराने चक्क मौल्यवान वस्तू मिळाल्या नाही म्हणून घरातील स्त्रीला किस(kiss) केलं. यामुळे घाबरून या महिलेने हिम्मत दाखवत यासंदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार नोंद केली आहे. सदर घटना ऐकून पोलीस देखील आश्चर्य चकित झाले.परंतु, त्यांनी तक्रार नोंद करून घेतली. एवढंच नव्हे तर त्वरित गुन्हेगाराला शोधून अटक देखील करण्यात आली आहे. यामुळे सभोवताली मोठी खळबळ उडाली आहे.
काय आहे नक्की प्रकरण?
पोलिसांनी दिलेलय माहितीनुसार, ३ जानेवारी रोजी सदर घटना घडली. आरोपी जेव्हा घरात घुसला त्यावेळेला सदर स्त्री घरी एकटीच होती. घराचा दरवाजा आतून बंद करण्यात आला. त्यानंतर त्या महिलेने आरडाओरडा करू नये यासाठी चोरट्याने तिचं तोंड दाबून ठेवले व तिला धमकावत, घरातील सर्व मौल्यवान वस्तू, पैसे कुठे आहेत विचारत मुद्देमाल देण्यास सांगितलं. परंतु, घरात काहीच मौल्यवान नसल्याचे त्या महिलेने आरोपीला सांगितलं. म्हणून चोरट्याने त्या महिलेला किस केलं आणि फरार झाला, अशी माहिती समोर आली आहे.
सदर घटनेमुले महिला घाबरून होती, मात्र चोर पळून गेल्यानंतर तिने हिम्मत दाखवत पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांना सगळा प्रकार कथन केला.ही अजब घटना ऐकून पोलसिसही क्षणभर थक्क झाले, पण त्यांनी लगेच गुन्हा दाखल करत त्या आरोपीचा शोध सुरू केला. धक्कादायक गोष्ट म्हणजे तो आरोपी हा त्याच भागातील रहिवासी असल्याचे समजले. सध्या बेरोजगार असल्यामुळे त्याने हा चोरी केल्याचा प्रयत्न्न केला असावा असा अंदाज आहे.
हे ही वाचा:
आगामी निवडणुकींसाठी मनसे पक्षात होणार नवीन बदल; Sandeep Deshpande यांचे वक्तव्य