Thursday, April 25, 2024

Latest Posts

पोलिसांच्या माहितीनुसार नाशिकमधले उंट हे नाशिकचेच!

नाशिक शहरात शंभरहून अधिक उंट आढळून आल्याने नाशिककर थक्क झाले आणि त्यामुळे अनेक चर्चाना वेग आला होता. काही लोकांनी अनेक तर्क वितर्क काढले जात आहे

नाशिक शहरात शंभरहून अधिक उंट आढळून आल्याने नाशिककर थक्क झाले आणि त्यामुळे अनेक चर्चाना वेग आला होता. काही लोकांनी अनेक तर्क वितर्क काढले जात आहे. काही लोक असे हि म्हणतं की, हे उंट हैद्राबाद मध्ये कत्तलीसाठी किंवा तस्करीसाठी पाठविले जात आहे. परंतु पोलिसांनी केलेल्या तपासातुन अशी माहिती समोर येत आहे कि त्या उंटाचे मालकही त्यांच्या सोबत असून ते नाशिकचेच रहिवासी आहेत. काही दिवसांपूर्वी नाशिक शहरात उंटांच्या रंगा दिसण्यात आल्या त्यामुळे सगळ्यांनाच आश्चर्य वाटले. त्यामुळे अनेक अफवा पसरल्या. यातील काही उंट हे वाईट अवस्थेत होते. त्यामुळे अनेकांच्या मनात याविषयी उत्सुकता वाढत गेली. स्थानिक प्राणिमित्रांना विचारल्यास त्यांनी हे उंट तस्करीसाठी हैद्राबादला नेले जात असल्याचे सांगितले. परंतु पोलीस तपासात वेगळीच बाब उघड झाली आहे. आढळून आलेले उंट हे काही दिवसांपासून गुजरातला वास्तवास होते, त्यानंतर ते पुन्हा नाशिकला आले होते. तर हा प्रवास करत असताना उंटांची अवस्था वाईट होत गेली.

सध्या हे उंट नाशिकच्या पांजरपोळ मध्ये ठेवले जात असून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत व त्यांची नीट काळजी सुद्धा घेतली जात आहेत. दरम्यान या उंटांसोबत असलेले त्यांचे मालक यांनी ‘आम्ही नाशिकचे असून उदरनिर्वाहासाठी उंटाचे पालनपोषण करत असल्याचे स्पष्ट केले आहे. परंतु आता प्रशासन काय पावले उचलणार आहेत या कडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे. मात्र आता प्रशासन नाशिक या शहरामध्ये दाखल झालेल्या उंटांना शासनाकडे सोपविणार कि त्यांना परत राजस्थानात पाठवणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

जेव्हा हे उंट नाशकात आले तेव्हा त्यांना पाहून अनेक जण थक्क झाले. अनेक लोकांना असे वाटले कि उंट कत्तलीसाठी जात आहेत. त्यामुळे अश्या अनेक अफवांना अफवा सर्वत्र पसरल्या होत्या. परंतु हे उंट धुळे, सटणा, दिंडोरी, मालेगाव या भागातून नाशिक शहरात दाखल झाले होते. त्यामुळे ह्या सर्वांची नोंद हि संबंधित पोलीस स्टेशन ला होत आहे असे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे साटणा पोलिसानी सर्वांचे आधार कार्ड तपासून नाशिकच्या दिशेने सोडले. पोलिसांनी असे सांगितले आहे कि गेल्या ३० वर्षांपासून ते नाशिक शहरात वास्तव्यास असून त्याना इथे काम मिळत नसल्यापासून त्यांनी गुजरातला प्रस्थान केले होते. आणि आता ते परत नाशिकला आले आहेत.

हे ही वाचा : 

नवी मुंबईकरांसाठी खुशखबर, वाशी ते स्वारगेट मार्गावर एसटीच्या शिवनेरी बस सुरू

सरकारकडून मिळणार ५२ कोटींचा निधी, शिर्डीत होणार कोणते बदल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

 

Latest Posts

Don't Miss