Plastic Side Effects : आजकाल धकाधकीच्या जीवनशैलीत खाण्याच्या सवयी झपाटयाने बदलताना दिसत आहेत. आताची पिढी घरच्या जेवणापेक्षा बाहेरच्या जेवणाला अधिक पसंती देतात. बाजारातून पॅक केलेले अन्न पार्सल घेतात आणि घरी आणतात, पण तुम्हाला माहीत आहे का? ज्या प्लॅस्टिकच्या डब्यात अन्न येते ते आपल्या आरोग्याच्या दृष्टीनें हानिकारक असते.
प्लॅस्टिकच्या भांड्यात अन्न खाल्ल्याने आरोग्यविषयक समस्या उद्भवू शकतात, त्याचबरोबर प्लॅस्टिकमधून विविध रासायनिक पदार्थ अन्नात मिसळून ते आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम करू शकतात. प्लास्टिकमध्ये बिस्फेनॉल ए आणि फॅथलेट्ससारखी अनेक हानिकारक रसायने असतात. यामुळे हृदयरोग, कर्करोग, लठ्ठपणा यासारख्या अनेक आजारांना आपल्याला सामोरे जावे लागते.
BPA (Bisphenol A) चा आरोग्यावर होणार परिणाम :
प्लॅस्टिकमध्ये BPA (Bisphenol A) असतो, जो एक रासायनिक पदार्थ आहे आणि अनेक प्लॅस्टिक पॅकेजिंगमध्ये वापरला जातो. हा पदार्थ अन्नाशी संपर्क करतो आणि हा BPA शरीराच्या हार्मोनल प्रणालीवर प्रभाव टाकतो, ज्यामुळे हार्मोनल संतुलित राहत नाही आणि प्रजनन क्षमता कमी होऊ शकते. तसेच, BPA कर्करोगाचा धोका वाढवू शकतो.
उष्णतेचा प्रभाव:
जर प्लॅस्टिकचा डब्बा उष्णतेच्या संपर्कात आला (जसे मायक्रोवेव्हमध्ये ठेवणे किंवा थोडा उष्ण असलेल्या अन्नावर प्लॅस्टिकचा डबा ठेवणे), तर त्यातले रासायनिक पदार्थ अधिक जलद गळतीस येतात आणि अन्नात मिसळू शकतात. यामुळे विषारी पदार्थ अन्नाच्या संपर्कात येतात, जे शरीराला हानिकारक ठरू शकतात. त्याचबरोबर प्लास्टिक कंटेनरमध्ये अन्न ठेवताना, त्यात असलेले रासायनिक पदार्थ अन्नातील पोषणतत्त्वे व आरोग्याला हानिकारक वि-किरण सोडू शकतात. यामुळे शरीरात जमा होणारे विषारी पदार्थ दीर्घकालीन आरोग्य समस्यांना कारणीभूत ठरू शकतात.
प्लॅस्टिक प्रदूषण :
प्लॅस्टिकचे कंटेनर नष्ट होण्यासाठी खूप वेळ लागतो, ज्यामुळे पर्यावरणात प्रदूषण निर्माण होते. प्लास्टिक अन्नामध्ये वापरले जाते मात्र, या प्लॅस्टिकचा योग्य पद्धतीने निकाल लावणे तेवढेच गरजेचे आहे, तरचं पर्यावरणातला धोका टळू शकतो.
यावर उपाय काय?
- प्लॅस्टिकच्या डब्ब्यांऐवजी काच (Glass) किंवा स्टील (Stainless Steel) च्या कंटेनर्सचा वापर करावा.
- गरम अन्न प्लॅस्टिक डब्ब्यात ठेवू नये, जर प्लॅस्टिक कंटेनरमध्ये अन्न असेल तर ते त्वरित एका वेगळ्या भांड्यात काढून घ्यावे.
- प्लॅस्टिक डब्ब्यांचा किंवा पिशव्यांचा वापर टाळा जेणेकरून प्रदूषण होणार नाही.
- अन्न पदार्थ विकत घेताना त्याच्या पॅकेजिंगवर असलेल्या सूचनांचा आणि रासायनिक घटकांचा तपास करा.
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.