Saturday, June 3, 2023

Latest Posts

आमदार मेघना बोर्डीकर यांना ‘भारत गौरव पुरस्कार’ जाहीर

लंडन येथील भारतीयांच्या वतीने देण्यात येणारा अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणारा 'भारत गौरव पुरस्कार' यंदा भाजपच्या आमदार मेघना साकोरे- बोर्डीकर (Meghna Bordikar) यांना जाहीर झाला आहे.

लंडन येथील भारतीयांच्या वतीने देण्यात येणारा अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणारा ‘भारत गौरव पुरस्कार’ यंदा भाजपच्या आमदार मेघना साकोरे- बोर्डीकर (Meghna Bordikar) यांना जाहीर झाला आहे. ब्रिटनच्या संसदेत एका भव्य सोहळ्यात हा पुरस्कार मेघना बोर्डीकर यांना प्रदान करण्यात येणार आहे. चित्रपट दिग्दर्शक मधुर भांडारकर, गायत्री परिवाराचे मुख्य चिन्मय यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम ब्रिटिश संसदेत पार पडणार आहे.विविध क्षेत्रात गौरवास्पद कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना ‘भारत गौरव पुरस्कार’ देण्यात येतो. दरम्यान मेघना साकोरे-बोर्डीकर यांचे सामाजिक कार्य, विकासाप्रती बांधिलकी, कर्तव्यपूर्तीची भावना, पर्यावरणासाठी त्यांनी केलेले कार्य यामुळे देशाच्या सामाजिक आणि भौतिक विकासात त्यांनी भर घातल्याचे कळवत आयोजकांनी त्यांना ब्रिटिश संसदेत होणाऱ्या या पुरस्काराच्या वितरणासाठी सन्मानपूर्वक आमंत्रण दिले आहे.

मागील दहा वर्षांपासून हा पुरस्कार देण्यात येतो. या आधी ‘भारत गौरव पुरस्कार’ आर्ट ऑफ लिविंगचे संस्थापक श्री श्री रविशंकर, चित्रपट कलाकार मनोज कुमार, नोबेल पारितोषिक विजेते कैलास सत्यार्थी, जगातील सर्वात प्रभावशाली महिला श्रीमती इंदिरा नूयी, जैन संत पुलक सागर, आचार्य लोकेश मुनी, गुगलचे सीईओ संजय गुप्ता, दिवंगत मेजर ध्यानचंद, जीमेलचे शिवा अय्यादुराई, स्व. निरजा भानोत, प्रेरक वक्ते गौर गोपालदास, सीमा तापडिया यांना देण्यात आला आहे. मात्र यंदाच्या पुरस्कारकर्त्यांच्या यादीत मेघना बोर्डिकर यांचे नाव असल्याने जिल्हाभरात कौतुक होत आहे. या निमित्ताने महाराष्ट्राचे नाव ब्रिटिश संसदेत झळकावण्याचा मान परभणी जिल्ह्याला मिळाला आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. या पुरस्कार सोहळ्यात वेदांता ग्रुपचे सीएमडी डॉ. नरेश त्रेहान, जेट एअरवेजचे अंकित जालान, जिनिव्हा येथील शास्त्रज्ञ सीईआरएन अर्चना शर्मा, पोलंड येथील अमित लाथ यांच्यासह जपान, उझबेकिस्तान, भारत, यूएसए, युके, युरोप, न्यूझीलंड, फ्रान्ससह जगभरातील तब्बल वीस देशातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या भारतीयांना हा पुरस्कार ब्रिटिश संसदेत वितरण करण्यात येणार आहे.

लंडन येथील भारतीयांच्या वतीने देण्यात येणारा अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणारा ‘भारत गौरव पुरस्कार’ यंदा भाजपच्या आमदार मेघना साकोरे- बोर्डीकर यांना जाहीर झाल्याचं कळताच त्यांच्या कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला आहे. विशेष म्हणजे हा पुरस्कार अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जातो. आत्तापर्यंत देशातील काही मोजक्याच लोकांना हा पुरस्कार मिळाला आहे. दरम्यान यात आता आमदार बोर्डीकर यांची भर पडली आहे. त्यामुळे बोर्डीकर यांच्या कुटुंबासह त्यांच्या कार्यकर्ते आणि मित्रमंडळी यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण बघायला मिळत आहे.

हे ही वाचा : 

सुषमा अंधारे शरद पवारांबद्दल बोलताना झाल्या भावुक

आपण ‘ग्रुपिझम’कडे सकारात्मकतेनं पहिले पाहिजे, दिप्ती देवी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss