spot_img
Wednesday, February 19, 2025

Latest Posts

रेल्वे भरती देणाऱ्यांसाठी मोठी बातमी; ३२ हजार ४३८ पदं भरली जाणार

रेल्वे भरती देणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. रेल्वे भरती बोडनि पुन्हा एकदा पदभरती जाहीर केली आहे. रेल्वेकडून एक शॉर्ट नोटीस जारी करण्यात आलेली असून वर्ग चारमधील विविध संवर्गातील ३२ हजार ४३८ पदं भरली जाणार आहेत. अर्ज करण्यसासाठी २३ जानेवारीपासून ऑनलाईन सुविधा देण्यात आलेली आहे. २३ जानेवारी ते २२ फेब्रुवारी दरम्यान उमेदवारांना अर्ज दाखल करता येणार आहे. उमेदवारांनी अपूर्ण कागदपत्रांच्या पूर्णत्वासाठी आतापासून तयारीला लागणं आवश्यक आहे.

 

रेल्वे भरती बोर्डाने आज गुरूवारपासून ३२,००० हून अधिक पदांसाठी भरती सुरू केली. अर्ज करू इच्छिणारे उमेदवार आजपासून RRBच्या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज सादर करू शकतात, असे देखील रेल्वे बोर्डाने अधिकृतपणे दिलेल्या माहितीत म्हटले आहे.

यासाठी अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २२ फेब्रुवारी २०२५ आहे. याशिवाय, उमेदवार २३ फेब्रुवारी ते २४ फेब्रुवारी २०२५ पर्यंतच्या अंतिम तारखेनंतर अर्ज शुल्क भरू शकतील. अर्ज दुरुस्तीसाठी सुधारणा विंडोची तारीख आणि वेळ २५ फेब्रुवारी ते ६ मार्च २०२५ आहे, असेही रेल्वे बोर्डाने म्हटले आहे.

नेमकी पात्रता काय ?

रेल्वे विभागात वर्ग चारमध्ये पोस्ट मिळवण्यासाठी उमेदवार केवळ दहावी पास असणं आवश्यक आहे. दहावी किंवा एनसीव्हीटीमधून एनएसी प्रमाणपत्र आवश्यक आहे. याशिवाय १ जुलै २०२५ पर्यंत उमेदवाराचं वय १८ ते ३६ वर्षाच्या मध्ये असणं आवश्यक आहे. यामध्येही नियमांनुसार सूट मिळणार आहे.

महत्त्वाच्या तारखा

* जाहिरातीची तारीख २८ डिसेंबर २०२४

* अर्जाची तारीख २३ जानेवारी २०२५

* अर्ज दाखल करणे आणि फी भरणे- २२ फेब्रुवारी २०२५

* हॉल तिकीट- परीक्षेच्या पूर्वी

* परीक्षेची तारीख यथावकाश जाहीर होईल.

परीक्षा शुल्क

रेल्वे भरतीसाठी अर्ज करणाऱ्या खुल्या (Open) वर्गातील उमेदवारांना ₹५०० परीक्षा शुल्क भरावे लागेल. CBT मध्ये बसण्यासाठी लागू असलेले बँक शुल्क वजा करून योग्य वेळी ₹४०० परत केले जातील. त्याचप्रमाणे, PwBD/महिला/ट्रान्सजेंडर/माजी सैनिक उमेदवार आणि SC/ST/अल्पसंख्याक समुदाय/आर्थिकदृष्ट्या मागास वर्ग (EBC) च्या उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क ₹२५० आहे, जे बँक शुल्क वजा केल्यानंतर योग्य वेळी परत केले जाईल.

अर्ज कसा करायचा

RRB च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. मुख्यपृष्ठावर, CEN क्रमांक ०८/२०२४ अंतर्गत RRB भरतीसाठी अर्ज करण्यासाठी लिंकवर क्लिक करा. लॉग इन करण्यासाठी आणि सबमिट करण्यासाठी तुमचे क्रेडेन्शियल्स एंटर करा. अर्ज फॉर्म भरा, अर्ज शुल्क भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. कन्फर्मेशन पेज सबमिट करा आणि डाउनलोड करा. भविष्यातील संदर्भासाठी कन्फर्मेशन पेजची प्रिंटआउट ठेवा.

तर कोणत्या विभागासाठी पदासाठी जागा उपलब्ध आहे बघुयात.

ट्रैफिक-पॉइंट्समैन-B- 5058

इंजीनियरिंग-असिस्टेंट (ट्रैक मशीन)- 799

ट्रैक मेंटेनर ग्रेड IV-13187

असिस्टेंट ब्रिज-301

मैकेनिकल-असिस्टेंट (C&W)-2587

असिस्टेंट लोको शेड (डीजल)- 420

असिस्टेंट (वर्कशॉप) (मैकेनिकल)-3077

एस एंड टी -सिस्टेंट (एस एंड टी)-2012

इलेक्ट्रिकल-असिस्टेंट टीआरडी-1381

असिस्टेंट लोको शेड (इलेक्ट्रिकल)-950

इलेक्ट्रिकल असिस्टेंट टीआरडी-1381

असिस्टेंट ऑपरेशन (इलेक्ट्रिकल)-744

असिस्टेंट टीएल पेड एसी-1041

असिस्टेंट टीपल पेड़ एसी (वर्कशॉप)-624 जागा आहेत.

हे ही वाचा : 

Latest Posts

Don't Miss