spot_img
Wednesday, February 19, 2025

Latest Posts

Maharashtra kesari स्पर्धेवरून बिग बॉस मराठी फेम DP ची पोस्ट चर्चेत

डीपीने त्या पोस्टमध्ये काही ओळी लिहील्या आहेत, मी कोणत्याही गोष्टीच समर्थन नाही करत. पण निर्णय चुकला आहे असे राक्षे यांचे मत आहे. त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारे जे हावभाव होते, ते एका खेळाडूलाच समजतील.” “इतकी वर्षे मेहनत करुन असा पराभव कोणत्या खेळाडूला आवडेल?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच न्याय झाला की अन्याय ? असा सवालही त्यांनी पोस्टच्या खाली चाहत्यांना विचारला आहे. त्याच्या या पोस्टची सध्या बरीच चर्चा सुरू आहे.

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या (MAharashtra Kesari) उपांत्य सामन्यावेळी अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला. महाराष्ट्र केसरी स्पर्धेत शिवराज राक्षे याचा पराभव झाल्यानंतर त्यांनी पंचाच्या निकालाविरोधात नाराज व्यक्त करीत त्यांना लाथ मारल्याचा प्रकार घडल्याने गोंधळ उडाला होता. या सामान्यात पंचाने शिवराज राक्षेला बाद केलं. त्यामुळे शिवराजने चिडून पंचाला लाथ मारली आणि शिवीगाळ केली होती. त्यानंतर मैदानात एकच गोंधळ उडाला. धक्काबुक्कीही झाली, अर्धा तास हा गोंधळ सुरू होता. त्यानंतर महेंद्र गायकवाड(Mhendra Gaikwad)  आणि पृथ्वीराज मोहोळ (pruthviraj Mohol) यांच्यात अंतिम सामना सुरू झाला. यावेळी हाफ टाइममध्ये महेंद्रने पंचाशी वाद घालयाला सुरुवात केली. त्याने पंचाला शिवागीळ केली आणि हुज्जत घालत थेट मैदानच सोडलं. त्यामुळे पृथ्वीराजला विजयी घोषित करण्यात आलं. मात्र, या दोन्ही पैलवानांच्या गैरवर्तनाची दखल घेऊन कुस्तीगीर परिषदेने शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड या दोघांनाही तीन वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे.

याबद्दल अनेकांनी आपले मत व्यक्त केले आहेत. आता ‘बिग बॉस मराठी ५’ मुळे लोकप्रिय ठरलेला डीपी दादा अर्थात धनंजय पोवार (Dhananjay powar) याने महाराष्ट्र केसरी स्पर्धेबाबत एक पोस्ट केली आहे. डीपीने त्या पोस्टमध्ये काही ओळी लिहील्या आहेत, मी कोणत्याही गोष्टीच समर्थन नाही करत. पण निर्णय चुकला आहे असे राक्षे यांचे मत आहे. त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारे जे हावभाव होते, ते एका खेळाडूलाच समजतील.” “इतकी वर्षे मेहनत करुन असा पराभव कोणत्या खेळाडूला आवडेल?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच न्याय झाला की अन्याय ? असा सवालही त्यांनी पोस्टच्या खाली चाहत्यांना विचारला आहे. त्याच्या या पोस्टची सध्या बरीच चर्चा सुरू आहे.

‘बिग बॉस मराठी ५’ (Big Boss Marathi 5) हा सीझन संपून अनेक महिने उलटून गेले तरीही त्यातील अनेक स्पर्धक चर्चेत असतात. सूरज चव्हाण विजेता ठरला असला तरी इतर स्पर्धकांचीही बरीच चर्चा होत असते. त्यापैकीच एक म्हणजे कोल्हापूरचा रांगडा गडी डीपी उर्फ धनंजय पोवार. सोशल मीडिया इन्फ्लुएंसर धनंजय पोवार देखील ‘बिग बॉस मराठी’च्या या सिझनमध्ये होता. त्याचा गेम आणि ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील वावर प्रेक्षकांना आवडला आता बिग बॉस संपलं असलं तरी तो सोशल मीडियावर बराच ॲक्टिव्ह असतो. तो अनेक पोस्ट करत असतो.आता महाराष्ट्र केसरी स्पर्धेमुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

हे ही वाचा : 

बॉलीवूड अभिनेत्री Priyanka Chopra भावाच्या लग्नासाठी मुंबईत दाखल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .

Latest Posts

Don't Miss