कोरोनाची जीवघेणी साथ आटोक्यात आल्यानंतर जवळ-जवळ सर्वच वस्तूंचे दर वाढलेले दिसून येत आहेत. त्यात जगभरातील तांदळाच्या दरांनी महागाईची उंची गाठली आहे. त्यामुळे अनेक देशांनी तांदळाच्या निर्यातीवर निर्बंध आणले आहेत. देशांच्या अंतर्गत तांदळाचा कोरोना साथ संपल्यापासून जगभरात तांदळाचे दर वाढले आहेत. त्यामुळे अनेक देशांनी निर्यातीवर निर्बंध घातले आहेत. देशांतर्गत तांदळाचा तुटवडा होऊ नये याकडे प्रामुख्याने तांदूळ उत्पादक देशांचे लक्ष आहे. ऑगस्ट महिन्यात भारताने निर्यातक्षम बासमती तांदळाचा प्रति टन दर १२०० डॉलर इतका वाढवला होता. मात्र, हा दर पुन्हा खाली आणला आहे.
प्रत्येक देशातील बासमती तांदळाचा तुटवडा पडू नये आणि दर नियंत्रणात राहावी, यासाठी सरकारने हा निर्णय घेतला होता. मात्र, आता निर्यात होणाऱ्या बासमती तांदळाच्या किंमतीत दर प्रतिटन ९५० इतका करण्यात आला आहे. अडीचशे डॉलरची कपात दरामध्ये करण्यात आली असून किमान निर्यात दर कमी करण्याची मागणी व्यापाऱ्यांनी लावून धरून होती. जगभरातील सुगंधी बासमती तांदळाची निर्यात भारतासोबतच पाकिस्तानकडूनही करण्यात येते. मात्र, भारताचा तांदूळ महाग झाल्याने पाकिस्तानकडून होणाऱ्या निर्यातीत वाढ झाली होती. कारण, जागतिक बाजारपेठेत पाकिस्तानी तांदूळ स्वस्त झाला होता. बासमती तांदळाच्या निर्यातीचे मार्केट पाकिस्तान काबीज करेल का, अशी शंका उपस्थित केली जात होती. मात्र आता भारताने निर्यातीची किंमत कमी केल्याने पुन्हा बासमती तांदळाची निर्यात वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्याकडे व्यापाऱ्यांनी किंमत कमी करण्याची मागणी केली होती. त्यानंतर झालेल्या बैठकीत गोयल यांनी व्यापाऱ्यांची मागणी मान्य केली होती. शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचा चांगला भाव मिळावा यावर लक्ष केंद्रित करण्यात आले होते. तसेच तांदळाच्या दराचा सातत्याने आढावा घेऊन त्यानुसार पुन्हा निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी दिली. आता तांदळाच्या निर्यातीचे दर कमी केल्याने पुन्हा भारतीय तांदूळ जागतिक बाजारात स्पर्धात्मक दराने विकला जाणार आहे. मागच्या वर्षी पश्चिम आशियाई देश आणि अमेरिकेत भारताकडून सर्वाधिक तांदूळ विकण्यात आला होता.
हे ही वाचा :
Sharad Pawar Live, महत्वपूर्ण निर्णयांमुळे देशाच्या कृषिक्षेत्राचा चेहरा मोहरा बदलला
संजय राऊत यांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल, मुख्यमंत्री भाजपची भांडी घासतात…