spot_img
Monday, January 13, 2025

Latest Posts

हिवाळ्यात सांधेदुखी वाढत असेल तर ‘या’ टिप्स नक्की फॉलो करा

हिवाळ्यात अनेकांना हात-पाय दुखण्याच्या समस्या चालूच असतात, स्नायू आखडणे, उठताना आणि बसताना गुडघ्यात कळ येणे अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. याच समस्या दूर करायच्या असतील तर तुम्ही घरगुती उपाय म्हणून ‘या’ टिप्स नक्की करून बघा.

थंडीचे दिवस सुरु आहेत अश्यातच आजार डोके वर काढायला सुरुवात होते. सर्दी-खोकला किंवा घश्याच्या समस्या उद्भवतात. त्याचसोबत सांधेदुखीचा त्रास सुरु होतो. संधिवाताची समस्या असणाऱ्यांना याचा अधिक त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे दैनंदिन जीवनात थोडा बदल करून आपण या त्रासापासून नक्कीच वाचू शकतो. त्यासाठी हे उपाय नक्की करून बघा.

स्वत:ला उबदार ठेवा – हातापायाचे स्नायू आखडत असतील किंवा दुखत असतील तर स्नायूंना गरम ठेवणे गरजेचे आहे. त्यासाठी तुम्ही गरम पाण्याचा शेक घ्या किंवा गरम कपडे घाला त्यामुळे स्नायू अधिक मजबूत होतात आणि रक्ताभिसरण वाढते. त्यामुळे सूज कमी होऊन आराम मिळते.

दररोज व्यायाम करा – व्यायाम हाडांना बळकट करतो आणि ऑस्टियोपोरोसिससारख्या समस्यांपासून संरक्षण करतो. व्यायाम करताना सुरवातीला हलका व्यायाम निवडा आणि हळूहळू त्याची तीव्रता वाढवा. शरीराची सर्वांगीण कार्यक्षमता सुधारते.

तेलाचा मसाज – तेलाचा मसाज शारीरिक आणि मानसिक तणाव कमी करतो, ज्यामुळे शरिराला आराम मिळतो. तेलाचा मसाज हाडांची ताकद आणि लवचिकता वाढवण्यास मदत करतो. तेल मसाज करताना तिळाच्या तेलाचा वापर करा. तिळाच्या तेलात हळद टाकून मालिश केल्याने हळदीतील एंटी इंफ्लेमेटरी गुणाचा फायदा होतो.

हॉट एण्ड कोल्ड थेरपी – हात-पाय दुखत असतील तर हीट पॅकर्सचा वापर करु शकता. तर इंफ्लेमेशन आणि सूज कमी करण्यासाठी कोल्ड पॅकचा देखील वापर करु शकता.

हळद आणि आल्याचा चहा – हळद आणि आल्यामध्ये पॉवरफूल इंफ्लेमेटरी गुण असतात. रोज एक कप हळद-आल्याचा चहा प्यायल्याने सूज कमी होते. त्याचसोबत सांधे दुखणे आणि आखडणे कमी होण्यास मदत होते.

हे ही वाचा:

Eknath Shinde Live: विधानसभेत मिळालेला विजय ऐतिहासिक, मी कॉमन मॅन म्हणून….काय म्हणाले एकनाथ शिंदे?

लोकसभेच्या निवडणूकीतून आम्ही जे शिकलो तसं महाविकास आघाडीने शिकलं पाहीजे: Chandrashekhar Bawankule

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Latest Posts

Don't Miss