Thursday, March 28, 2024

Latest Posts

उन्हाळ्यात घरच्या घरी बनवा, घरगुती मसाला ताक

उन्हाळयात शरीर थंड ठेवण्यासाठी जर कोणत पेय मदत करत असेल तर ते मसाला ताक आहे. ताक पिण्याचे अनेक फायदे आहेत.

उन्हाळयात शरीर थंड ठेवण्यासाठी जर कोणत पेय मदत करत असेल तर ते मसाला ताक आहे. ताक पिण्याचे अनेक फायदे आहेत. कोणाला जर दही पचत नसेल तर अशांना देखील ते मोडून त्याच ताक बनवून पियाचा सल्ला दिला जातो. दही – पाणी – मीठ एकत्र करून घुसळून ताक बनवले जाते. जर तुम्हाला चटपटीत आणी पचनाला सोपे असे मसाला ताक बनवायचे असेल तर घराच्या घरी काही सोप्या साहित्यापासून तुम्ही झटपट मसाला ताक बनवू शकतात.

साहित्य –

  • ४ कप दही
  • ५ कप पाणी
  • २-३ हिरव्या मिरच्या
  • १ इंच आल्याचे तुकडे
  • १ टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर
  • ४-५ पुदिना पाने
  • १ टेबलस्पून भाजलेली जिऱ्याची पावडर
  • सेंधवा मीठ
  • साखर

कृती –

सर्वप्रथम, दही मध्ये पाणी घालून घुसळून ताक करून घ्यावे. आता मठ्ठा तयार करण्यासाठी ताकातील निम्म्या ताकामध्ये साखर, सेंधवा मीठ, जिरेपूड, कोथिंबीर, १-२ पुदिना पाने बारीक चिरून, थोडं आल्याचे बारीक तुकडे घाला. आणि व्यवस्तिथ घुसळून वरून पुदिना ची पाने टाका. नंतर मसाला ताक करण्यासाठी हिरव्या मिरच्या , कोथिंबीर, आलं आणि पुदिनाची पाने सर्व एकत्र मिक्सर मध्ये बारीक करून घ्या .

आता, हि पेस्ट ताकामध्ये घालून चांगली एकजीव करून घ्या. नंतर ताकत थोडेसे सेंधवा मीठ, साखर आणि चाट मसाला टाकून घुसळून घ्या.
वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून सर्व्ह करा. तुमचा चमचमीत मसाला ताक तयार होईल

हे ही वाचा : 

उन्हाळ्यात चेहरावर टॅनिंग आलंय? या तीन गोष्टींचा वापर नक्की करा

Summer Tips, उन्हाळ्यात सुती कपडे घालण्याचे आहेत ‘हे’ फायदे

बनवा घराच्या घरी झटपट टोमॅटो राइस

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss