Friday, April 19, 2024

Latest Posts

उन्हाळ्यात शरीराला थंडावा देण्यासाठी बनवा जलजीरा सरबत

उन्हाळा सुरू झाला आहे त्यामुळे उन्हाच्या तीव्र झळांमुळे होणारी उकाडा आता असह्य होत आहे. कडक ऊन आणि वाढत्या उकाड्याने हैरान लोक असे पेय शोधत आहेत जे शरीराला थंडावा देऊ शकता.

उन्हाळा सुरू झाला आहे त्यामुळे उन्हाच्या तीव्र झळांमुळे होणारी उकाडा आता असह्य होत आहे. कडक ऊन आणि वाढत्या उकाड्याने हैरान लोक असे पेय शोधत आहेत जे शरीराला थंडावा देऊ शकता. आज आम्ही तुम्हाला अशीच एक रेसिपी सांगणार आहोत. हे पेय उन्हाळ्यात आवडीने प्यायले जाते ज्याला जलजीरा म्हणून ओळखले जाते. जलजीरा प्यायल्याने शरीराला थंडावा तर मिळतोच पण त्यासोबतच पोटाला देखील आराम मिळतो.

जलजीरा करण्याचे साहित्य : 

पुदीना -१/२ कप
हिरवा कोथिंबिर – १/४ कप
बर्फ ४-५ खडे
बुंदी – १ टेबलस्पून
आले – १ टेबलस्पून
चिंच पेस्ट – १ टेबलस्पून
जीरा पावडर – १ टेबलस्पून
मीठ – १ टेबलस्पून
काळी मिरी पावडर – १/४ टेबलस्पून
धने – १/२ टेबलस्पून
बडीशेप – १/२ १ चमचा
आमचूर पावडर – १ चमचा
१ हिंग -१ चिमुट
साखर – १ चमचा
लिंबाचा रस – १ चमचा

जलजीरा तयार करण्याची कृती :

जलजीरा तयार करण्यासाठी सर्वात आधी पुदीना, हिरवी कोथिंबिर आणि आले मिक्सरमध्ये एकत्र वाटून पेस्ट बनवाय,आता या पेस्टला एका मोठ्या भांड्यात टाका ज्यामध्ये जलजीरा तयार करायाचा आहे.आता यामध्ये चिंचेची पेस्ट, मिठ, काळी मिरी, हिंग, बडीशेप, जीरा पावडर, आमचूर पावडर, लिंबाचा रस आणि साखर टाकून व्यवस्थित एकत्र करून घ्या.त्यानंतर यामध्ये २ कप पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करा.एक ग्लासमध्ये बर्फाचे तुकडे टाकून त्यामध्ये जलजीरा पाणी टाकून त्यावर वरुन बुंदी आणि पुदीना टाकून सजवू शकता.

हे ही वाचा : 

पोनियिन सेल्वन २ची बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी

‘Unlock Zindagi’ चित्रपट ठरला नऊ राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कारांचा मानकरी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss