spot_img
Wednesday, January 15, 2025

Latest Posts

New Year 2025 : नवीन वर्षाच्या सुरुवातीच्या ब्रम्ह मुहूर्तावर करा ‘या’ गोष्टी; जाणून घ्या याचे फायदे

New Year 2025 : नव्या वर्षाचा पहिला दिवस सगळ्यांसाठी खास असतो. या नव्या वर्षात दिवसाची सुरुवात सकारात्मक पद्धतीने व्हावी त्याबरोबर घरात सुख-शांती नांदावी, घरासोबतच कुटुंबियांचे आरोग्य निरोगी राहावे. यासाठी ‘या’ ब्रम्ह मुहूर्तावर याही गोष्टी करणं गरजेचं आहे.

नवीन वर्ष सुरु व्हायला आता काहीच तास उरले आहेत. येत्या नवीन वर्षाची नवीन दिवसाची सुरुवात सकारात्मक पद्धतीने व्हावी यासाठी प्रत्येकजण या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर असे काही काम करु इच्छितात जेणेकरून संपूर्ण वर्ष सुख-शांतीच, भरभराटीच जाईल.
वैदिक पंचांगानुसार, वर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच 1 जानेवारी 2025 रोजी ब्रह्म मुहूर्ताची वेळ पहाटे 05 वाजून 25 मिनिटांपासून ते सकाळी 06 वाजून 19 मिनिटांपर्यंत असणार आहे.
या मुहूर्तावर स्नान करुन मंदिरात जाऊन दर्शन घेऊन काही मंत्राचा जप करा. त्यानंतर हातत जल घेऊन तुमच्या मनातील इच्छा व्यक्त करून ते पाणी ओता.
ब्रह्म मुहूर्तावर तुम्ही गायत्री मंत्र, महामृत्यूंजय मंत्राचा जप करा.असे केल्यास विष्णूची कृपा तुमच्यावर कायम राहील.
नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी सकारात्मक विचार करणे खूप महत्त्वाचे आहे. मनाशी ठरवा की हे वर्ष तुम्हाला सर्व प्रकारच्या यश, सुख आणि समाधान देईल.
नवीन वर्षाची सुरुवात ही आत्मबोध आणि अध्यात्मिक उन्नतीची वेळ असते. ब्रह्म मुहूर्तात केलेली साधना आणि प्रार्थना त्या वर्षासाठी एक शुभ प्रारंभ ठरते.

 

Latest Posts

Don't Miss