महाराष्ट्रातील निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुतीत सत्ता मिळवण्यासाठी संघर्ष सुरूच आहे . त्यासाठी २० तारखेला होण्याऱ्या निवडणूक मतदानसाठी प्रचार रंगत आला आहे. या दोन्ही गटाच्या नेत्यांची सर्व शक्ती पणाला लावली आहे. आता नंदुरबारमध्ये राहुल गांधी यांनी सभा घेतली. या सभेत त्यांनी अनेक घोषणा केल्या. राहुल गांधी म्हणाले, महाविकास आघाडीच्या महालक्ष्मी योजनेमुळे महिलांच्या खात्यात प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला खटाखट तीन हजार रुपये मिळणार आहे. तुम्ही सकाळी उठल्यावर तुमच्या खात्यात तीन हजार रुपये दिसणार आहे. त्यानंतर तुम्हाला बसमध्ये तिकीट मोफत असणार आहे. तुम्ही तिकीट न काढता बँकेत किंवा राज्यभरात कुठेही जाऊ शकणार आहे, असे राहुल गांधी यांनी सांगितले आहे.
भारत सरकार ९० अधिकारी चालवतात. परंतु त्यामध्ये केवळ एक व्यक्ती अधिवासी आहे. त्या अधिकाऱ्यास मागे बसवले आहे. त्याला निर्णय घेण्याचा अधिकार नाही. त्याला आदिवासी असल्यामुळे काम दिले जात नाही. भारत सरकार शंभर रुपये खर्च करत असेल तर आदिवासी अधिकारी दहा पैसे खर्च करण्याचा निर्णय घेतात. आदिवासी देशात आठ टक्के आहे. परंतु त्यांची भागेदारी नाही. माध्यमांमध्ये, तसेच आदाणी, अंबानी यांच्या कंपनीत एक अधिकारी मिळणार नाही. परंतु मजुरांची यादी केली तर त्यामध्ये आदिवासी मिळतात. आदिवासींना सरकारमध्ये अधिकार मिळावे, सत्तेत वाटा मिळावा, आदिवासी अधिकारी व्हावे, ही आम्ही करु, असे राहुल गांधी यांनी सांगितले. महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर शेतकऱ्यांना तीन लाख कर्ज माफ होणार आहे. आरक्षण ५० टक्केची मर्यादा रद्द करणार आहे. जातीय जनगणना करणार आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले. बेरोजगारांना ४ हजार रुपये महिना देणार आहे. अडीच लाख तरुणांना सरकारी नोकरी देणार आहे. सरकार आल्यास गरिबाला उपचारासाठी राज्यात २५ लाखापर्यंत विमा सुरक्षा देणार असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले.
महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर शेतकऱ्यांना तीन लाख कर्ज माफ होणार आहे. आरक्षण ५० टक्केची मर्यादा रद्द करणार आहे. जातीय जनगणना करणार आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले. बेरोजगारांना ४ हजार रुपये महिना देणार आहे. अडीच लाख तरुणांना सरकारी नोकरी देणार आहे. सरकार आल्यास गरिबाला उपचारासाठी राज्यात २५ लाखापर्यंत विमा सुरक्षा देणार असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले. महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर शेतकऱ्यांना तीन लाख कर्ज माफ होणार आहे. आरक्षण ५० टक्केची मर्यादा रद्द करणार आहे. जातीय जनगणना करणार आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले. बेरोजगारांना ४ हजार रुपये महिना देणार आहे. अडीच लाख तरुणांना सरकारी नोकरी देणार आहे. सरकार आल्यास गरिबाला उपचारासाठी राज्यात २५ लाखापर्यंत विमा सुरक्षा देणार असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले.
हे ही वाचा:
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? चाणक्यनीतीने Amit Shah यांनी टाकली गुगली
अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांना दिले थेट आव्हान…, म्हणाले…